शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 22:40 IST

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला.

श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याची आजही पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण होऊ शकली नाही. आफताबचे दोन राऊंड पूर्ण झाले असून जवळपास ८ तासांनी आफताब रोहिणीच्या FSL लॅबमधून बाहेर आला. आफताबला आजही ताप आल्याने त्याची चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. 

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात आफताब दररोज वेगवेगळ्या गोष्टी सांगत असल्याने तो खरे बोलतोय का, य़ाची माहिती मिळविण्यासाठी त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतली जात आहे. 

मंगळवारपासून त्याची पॉलिग्राफ टेस्ट केली जात आहे. बुधवारी देखील आफताबला ताप आला होता, यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. आता उद्या शुक्रवारी त्याची पुन्हा टेस्ट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ठाणे (ग्रामीण) भाईंदर खाडी परिसरात दिल्ली पोलिसांचे पथक पुरावे शोधत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी आफताबने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरdelhiदिल्ली