शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

२० हजार लीटर पाणी फ्री, तरीही 'त्या' महिन्यात ३०० रुपये बिल! श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात पोलिसांच्या हाती सबळ पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:52 IST

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आरोपी आफताबच्या सिंगल रूम फ्लॅटमधील पाण्याच्या वापराचे बिल आता पुरावा म्हणून पोलिसांना तपासात उपयोगी ठरणार आहे.

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आरोपी आफताबच्या सिंगल रूम फ्लॅटमधील पाण्याच्या वापराचे बिल आता पुरावा म्हणून पोलिसांना तपासात उपयोगी ठरणार आहे. दिल्लीतील प्रत्येक कुटुंबासाठी २० हजार लिटर पाणी मोफत उपलब्ध असतानाही त्याहून अधिक पाणी वापरल्याचं बिल आफताबला आलं होतं. याचाच अर्थ श्रद्धाच्या हत्येनंतर मृतदेह कापताना आरोपीनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय केमिकलचा वापर करुन रक्ताचे डाग नष्ट करण्यासाठी त्यानं पाण्याचा प्रचंड प्रमाणात वापर केला याचा पुरावा म्हणून पाण्याचं बिल महत्वाचा दुवा ठरणार आहे. 

सतत हसतोय अन् म्हणतोय एकाच गोष्टीचाच पश्चाताप वाटतोय; आफताबचा पोलिसांना जबाब

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या बिलाचे इनपुट आरोपपत्र आणखी मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. एका लहान कुटुंबासाठी २० हजार लिटर पाणी पुरेसे आहे. दिल्ली सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला एवढं पाणी मोफत दिलं जातं. आता जल बोर्डानं आफताबच्या फ्लॅटला ३०० रुपयांहून अधिकचे बिल पाठवले होते. यावरून आफताबने ६० हजार लिटरहून अधिक पाणी वापरल्याचं स्पष्ट झालं आहे. आफताबनं याआधीच तो बाथरुममध्ये शॉवरखाली मृतदेह कापण्याचा कबुली जबाब दिला आहे. अशा स्थितीत मृतदेह कापताना तासनतास शॉवर चालू असल्यानं इतकं पाणी वापरलं गेलं असावं, असा पोलिसांना संशय आहे. 

आरोपपत्रात पुरावा म्हणून पाण्याचं बिल उपयोगी ठरणारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबच्या कबुलीजबाबात या घटनेची संपूर्ण कहाणी यापूर्वीच समोर आली होती. पण यासंबंधीचे पुरावे फारच कमी होते. अशा स्थितीत पाण्याच्या बिलाची माहिती पोलिसांना खूप उपयोगी पडणार आहे. पोलीस त्यांच्या आरोपपत्रातही ही वस्तुस्थिती पटवून देण्याचा प्रयत्न करतील. याच जोरावर पोलीस न्यायालयात घटना सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शेजारी कुणालच आलं नव्हतं इतकं बिलआफताबच्या शेजारी राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत कोणालाही पाण्याचे बिल आलेलं नाही. एखाद्याला पाण्याचं बिल येणं ही संबंधित सोसायटीमधील ही पहिलीच वेळ आहे. तेही ३०० रुपयांचं बिल आलं आहे. आफताबच्या घरमालकानं दिलेल्या माहितीनुसार आफताब घरी अन्नही शिजवत नव्हता. तो बाहेरुनच जेवण मागवायचा. तसंच कपडेही लाँड्रीत देत होता. मग अशा स्थितीत त्यानं पाण्याचा एवढा वापर नेमका कुठं केला? ही आश्चर्याची बाब आहे. याच आधारावर पोलीस कोर्टात आपली बाजू मांडू शकतात.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी