शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

अर्धा तास कपडे पाहूनही खरेदी नाही; सेल्समनची सटकली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:21 IST

दादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू

नोयडा: दुकानात बराच काळ कपडे पाहूनही खरेदी न करणं एका तरुणाला महागात पडलं. वेळेचा अपव्यय केल्याबद्दल दुकानातील सेल्समन संतापला. त्यानं संबंधित तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाणदेखील केली. यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी कशीबशी तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची सुटका केली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित कुटुंबानं दादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ग्रेटर नोयडातील पाली गावचा रहिवासी असलेला अमित कुमार एका कुरियर कंपनीत काम करतो. रविवारी संध्याकाळी तो बहिण निकीता, सरोज आणि भाची टीनासोबत दादरीच्या बाजारातील एका कपड्याच्या दुकानात गेला होता. त्यावेळी त्यांनी खूप कपडे पाहिले. सेल्समन बराच वेळ त्यांना कपडे दाखवत होता. मात्र अमित यांच्या कुटुंबाला काहीच पसंत पडलं नाही आणि ते दुकानातून बाहेर जाऊ लागले. यावेळी संतापलेल्या सेल्समननं अमित यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. अमितनं शिवीगाळीला विरोध करताच सेल्समननं त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत अमित आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण करत त्यांना धक्के देऊन दुकानातून बाहेर काढलं. शिवीगाळ ऐकून शेजारचे दुकानदार कपड्यांच्या दुकानात पोहोचले. रस्त्यावरुन जाणाऱ्या काहींनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सेल्समन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरुन जात असलेल्या अमित यांचा पाठलाग केला. त्यांनी पुन्हा अमित आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. यावेळी सेल्समन्सनी अमितच्या कुटुंबातील तरुणींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अमित यांच्या कुटुंबानं या प्रकरणी दादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.