शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

बालकाला पळविणाऱ्या परप्रांतियास पोलीसांनी सोडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:01 IST

वैभववाडी पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; ग्रामस्थांनीच पुन्हा दिले पकडून

वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यातील कोळपे येथील दीड वर्षाच्या बालकाला पळूवन नेणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला स्थानिकांनी रविवारी(ता.१) पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. परंतु, पोलीस स्थानकातून तो परप्रांतीय पसार झाला. त्यानंतर पुन्हा त्याचा शोध घेऊन कोळपे ग्रामस्थांनीच त्याला पकडून दिले. मात्र, बालक चोरीचा गंभीर गुन्हा नोंदविण्याऐवजी संशयिताच्या बाबतीत पोलिसांनी बेफिकीरी दाखविल्यामुळे कोळपे ग्रामस्थ आक्रमक झाले असुन त्यांनी पोलीस स्थानकात येवुन पोलीसांशी हुज्जत घातली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया हाती घेतली आहे.     कोळपे येथील एका घरातील दीड वर्षाच्या  बालकाला घेवुन एक अनोळखी पळून जात होता. हा प्रकार बालकाच्या आईच्या नजरेस पडताच तिने आरडाओरडा केला. त्यामुळे तात्काळ जमलेल्या शेजा-यांनी पाठलाग करुन त्या व्यक्तीला पकडले. त्याच्याकडून बालकाला काढून घेऊन आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्या अनोळखी परप्रांतीयाला घेऊन बालकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी वैभववाडी पोलीस स्थानक गाठले. त्याला पोलीसांच्या स्वाधीन करुन त्याच्यावरुद्ध बालक चोरीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.      त्यावेळी ठाणे अंमलदाराने नातेवाईकांचा मोबाईल नंबर घेत उद्या सकाळी तुम्हाला बोलावून तक्रार घेतो, असे सांगीतले. त्यामुळे नातेवाईक रात्री उशिरा घरी गेले. मात्र, सकाळी पोलीस ठाण्यातून फोन न गेल्यामुळे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ पोलीस स्थानकात दाखल झाले. परंतु, रात्री पकडून दिलेली व्यक्ती त्यांना पोलीस स्थानकात दिसून आली नाही. चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती पसार झाल्याचे उघड झाल्याने संतापलेल्या कोळपे ग्रामस्थांनीच पुन्हा त्याचा शोध सुरु केला. बालकाला पळवून नेण्यासारख्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलीस स्थानकातुन पसार होतोच कसा? असा प्रश्‍न करीत ग्रामस्थांनी पोलीसांशी हुज्जत घातली. त्यावेळी ग्रामस्थ आणि पोलीसांमध्ये शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर पोलीस आणि ग्रामस्थ त्या व्यक्तीच्या शोधावर गेले.     वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकानजीक बालक पळवून नेताना पकडलेला  संशयित रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असल्याचे ग्रामस्थांना दिसला. त्यामुळे कोळपे ग्रामस्थांनी ही माहीती तत्काळ पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.ठाणे अंमलदारावर कारवाई करावी   दीड वर्षाच्या बालकाला घरातून पळवूनघेऊन जाणे. या गंभीर घटनेबाबत रविवारी(ता.१) रात्री गुन्हा दाखल करु न शकलेल्या ठाणे अंमलदाराविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पोलीस ठाण्यातून संशयित पळून गेला कसा? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसKidnappingअपहरण