शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात खळबळ उडविणारी घटना! पेट्रोल टाकून जि.प. शिक्षकाला जिवंत जाळले

By संतोष वानखडे | Updated: October 9, 2023 16:52 IST

उपचारादरम्यान मृत्यू : शिक्षण क्षेत्रात खळबळ, मालेगाव-बोरगाव रस्त्यावरील घटना

वाशिम : बोरगाव (ता.मालेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनोने (५३) यांना मालेगाव-बोरगाव मार्गावरील कोल्ही गावानजीक अज्ञात इसमांनी राॅडने मारून व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक व धक्कादायक घटना सोमवार, ९ आक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान घडली. यामागील कारण अस्पष्ट असून, घटनेचा पुढील तपास जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनची चमू करीत आहे.

दिलीप सोनोने हे जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ते एमएच ३७ वाय १४३८ क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाववरुन बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर आपले कर्तव्य बजावण्यासाठी जात होते.

आड वाटेतच कोल्ही शिवारात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना अडविले आणि लोखंडी राॅडने जबर मारहाण केली. अज्ञात इसम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पेट्रोल टाकून दिलीप सोनोने यांना जिवंत जाळले. घटनेची माहिती मिळताच जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी अवस्थेत सोनोने यांना प्रथम मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथील खासगी दवाखान्यात हलविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जऊळका रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे. या घटनेचा पुढील तपास  ठाणेदार प्रदीपकुमार राठोड करत आहेत.

वैयक्तिक वादाची किनार?वैयक्तिक वादातून अज्ञात इसमांनी दिलीप सोनोने यांना राॅडने मारहाण करून जीवंत जाळल्याची चर्चा आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथकेया घटनेतील अज्ञात आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, पथकेही नियुक्त केली. लवकरच आरोपीचा शोध घेवून जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.शिक्षण क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रियाजिल्हा परिषद शिक्षकाला जीवंत जाळल्याने शिक्षण क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह इतरही शिक्षकांमधून होत आहे. 

टॅग्स :washimवाशिम