शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मेजर रँकचे दोन अधिकारी मैत्रिणींसोबत फायरिंग रेंजमध्ये गेले, लुटारुंचा एकीवर सामुहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:31 IST

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी एकामागोमाग एक राज्य हादरू लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये मेजर रँकच्या दोन दोन अधिकाऱ्यांसोबत असूनही महिला ...

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी एकामागोमाग एक राज्य हादरू लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये मेजर रँकच्या दोन दोन अधिकाऱ्यांसोबत असूनही महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेजर रँकच्या दोन ट्रेनी अधिकाऱ्यांसोबत फायरिंग रेंजच्या जागेत फिरायला गेलेल्या त्यांच्या दोनपैकी एका मैत्रिणीवर लुटारुंनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

इंदौर जिल्ह्यातील आर्मीच्या कॅम्पच्या परिसरातच हा प्रकार घडला आहे. लुटारुंनी या दोन अधिकाऱ्यांना मारहाणही केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित सहा जण फरार झाले आहेत. इंदौरच्या महूमध्ये आर्मीचे कॉलेज आहे. तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी हे दोन अधिकारी आले होते. मंगळवारी रात्री अडीजच्या सुमारास या दोघांनी भाड्याने एक कार मागविली होती. दोन महिला मैत्रिणींना घेऊन हे दोघे जाम गेटच्या दिशेने फिरायला गेले. तिथे असलेल्या फायरिंग रेंजमध्ये कार उभी करून हे त्यांच्या मैत्रिणींसोबत बोलत बसले होते. एवढ्यात त्यांच्या कारला पिस्तुल, चाकू, दांडे घेऊन आलेल्या आठ लुटारुंनी घेरले. सैन्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, पैसे काढून घेतले. 

हे लुटारू एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी एका अधिकाऱ्याला आणि एका तरुणीला आपल्यासोबत ठेवत उर्वरित दोघांना पैसे आणण्यासाठी पाठविले. त्यांनी या लोकांकडे १० लाख रुपयांची मागणी केलेली. या लुटारुंनी एका मेजरला बाजुला नेले व त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले. 

दुसरा मेजर आणि तरुणी आर्मी कॉलेजच्या परिसरात पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. या मेजरने त्याच्या यूनिट कमांडिंग ऑफिसरला याची माहिती दिली. त्याने पोलिसांना बोलवत घटनास्थळ गाठले. एवढ्या गाड्या येत असल्याचे पाहून लुटारू पळून गेले होते. पोलिसांनी मेजरच्या सांगण्यावरून लुटमार, मारहाण, खंडणी आणि सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच १० टीम बनवून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपांचा शोध सुरु आहे. या महिला मैत्रिणी आर्मीच्याच अधिकारी होत्या की बाहेरील कोणी याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMolestationविनयभंगMadhya Pradeshमध्य प्रदेश