शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड

By बाळकृष्ण परब | Updated: February 16, 2021 09:01 IST

Crime News : या घटनेचे सुमारे चार व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये एका महिलेच्या खांद्यावर पुरुषाला बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

भोपाळ - एका महिलेला मारहाण करून, अपमानास्पद वागणूक देत तिच्या खांद्यावर दिराला बसवून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (women harassment) याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही घटना मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) गुणा जिल्ह्यात घडली आहे. गुणा जिल्ह्यातील सागई आणि बांसखेडी गावात हा प्रकार घडला आहे. (Madhya Pradesh Crime News)या घटनेचे सुमारे चार व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये एका महिलेच्या खांद्यावर पुरुषाला बसवण्यात आल्याचे दिसत आहे. या महिलेला एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चालवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित आहे. तिने सांगितले की, माझे पहिले सासर बांसखेडी गावात आहे. माझ्या पतीने मला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मी आधीच्या पतीच्या मर्जीनुसार मी अन्य व्यक्तीसोबत राहायला गेले. त्या तरुणासोबत मी सागई येथे राहू लागले.गेल्या महिनाभरापासून मी आणि हा युवक पती-पत्नीप्रमाणे राहत होतो. मात्र अचानक ९ फेब्रुवारी रोजी माझे आधीचे सासरे तसेच अन्य आठ जण सागई येथील माझ्या घरी आले. त्यांनी मला मारहाण करून आधीचे सासर असलेल्या बांसखेडी येथे नेले. सागई गावातून बांसखेडीचा रस्ता तीन किलोमीटर अंतरावर आहे. यादरम्यान मला मारहाण केली गेली. त्यानंतर माझा दीर माझ्या खांद्यावर बसला. त्या स्थितीत मला सागई येथून बांसखेडी पर्यंत नेण्यात आले, असे पीडित महिलेने सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून काही लोकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत सिरसी पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी मारहाणीच्या कलमांखाली चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, अशी विचारणा केली असता पोलिसांनी सांगतले की, सदर महिला तिच्या माजी पतीच्या घरातून गेली आणि माजी पतीचे कुटुंबीय तिला त्वरित घेऊन आले. तर पीडित महिलेचा दावा आहे की, ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत एक महिन्यापासून राहत होती. या महिलेचा दुसरा पती मजुरीसाठी घराबाहेर असताना हा सगळा प्रकार घडला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी