शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या वादातून पोटच्या मुलावर रोखली बंदूक, दृश्य पाहून आईला आला हार्ट अटॅक

By पूनम अपराज | Updated: January 1, 2021 15:59 IST

Crime News : शोकांतिका म्हणजे या घटनेत एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांचा मुलावर पार्किंगच्या वादातून बंदूक रोखली.

ठळक मुद्देहे थरारक दृश्य पाहून तेथे असलेल्या मुलाच्या ५० वर्षीय आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका दुर्दैवी घटना घडली आहे. शोकांतिका म्हणजे या घटनेत एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांचा मुलावर पार्किंगच्या वादातून बंदूक रोखली. हे थरारक दृश्य पाहून तेथे असलेल्या मुलाच्या ५० वर्षीय आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.ते कसे घडले

दीपा असे मृताचे नाव असून ते बैरागड परिसरातील रहिवासी होती. एक वीरुमल आहुजा नावाचा व्यक्ती त्यांच्या शेजारील घरात राहतो. बुधवारी रात्री दीपाचा अल्पवयीन मुलगा (इयत्ता 9 वीचा विद्यार्थी आहे) आणि आहुजाचा जावई, मनिष ओचानी यांच्या घराच्या बाहेर गाडी पार्किंगवरून जोरदार वाद झाला. लवकरच आहूजा आणि त्याची मुलगी सोनल (ओचनीची पत्नी) देखील वादात सामील झाले.

 

गोंगाट ऐकून दीपा आणि तिचा नवरा घराबाहेर आले आणि वाद आणखी विकोपाला गेला. अचानक ओचनीने दीपाच्या मुलाकडे बंदूक दाखविली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. हे थरारक दृश्य पाहून दीपाला हृदयविकाराचा झटका आला आणि ती खाली कोसळली. तिला दोन रूग्णालयात नेण्यात आले पण दोन्ही ठिकाणी तिच्या उपचारासाठी सुविधा नसल्याचे सांगून तिला दाखल करण्यास नकार दिला.त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने हमीदिया हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि आहुजा, त्याची मुलगी सोनल आणि तिचा नवरा ओचानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि दीपाचा मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात नमूद आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोनलने दावा केला आहे की, तिच्या पतीने अल्पवयीन मुलाला जी बंदूक दाखविली होती ती एक खेळण्यातली बंदूक होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशParkingपार्किंग