शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला भोवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 14:04 IST

२६ जानेवारीला बाळासाहेब चांदेरे यांनी मित्र परिवाराला बरोबर घेऊन चक्क तलवारीने केक कापला.

ठळक मुद्देहिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पिंपरी :हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी तालुक्यातील सूस येथे तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला भोवले आहे. वाढदिवस साजरा होत असताना, बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बाळासाहेब चांदेरे असे त्यांचे नाव असून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणुन ते या परिसरात कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने १५ जानेवारी २०१९ ला शस्त्र, तलवारी, भाले बाळगण्यास मनाई असल्याचा आदेश जारी केला आहे. असे असताना,२६ जानेवारीला चांदेरे यांनी मित्र परिवाराला बरोबर घेऊन चक्क तलवारीने केक कापला. तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणे त्यांना भोवले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार आर.एम.भालचिम यांनी या प्रकरणी चांदेरे यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी अधिक तपास करीत आहेत.