शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वार्तांकनावर सरसकट बंदी घातली तर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 19:32 IST

Shilpa Shetty Defamation Suit :न्या. गौतम पटेल यांच्या एकलपीठाने यूट्युब तीन खासगी व्यक्तींनी त्यांच्या चॅनेलवर अपलोड केलेले तीन व्हिडीओ काढण्यास सांगितले.

ठळक मुद्देशिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी अटक केल्यानंतर या तिन्ही व्हीडिओंमध्ये शिल्पा शेट्टीच्या नैतिकतेवर आणि तिच्या पालकत्वाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दावेदाराच्या मागणीमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. चांगले किंवा वाईट वार्तांकनाबाबत न्यायालयीन मर्यादा आहेत.

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याविरोधात कोणीही वार्तांकन करू नये, असे आदेश देणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या  स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदविले.

न्या. गौतम पटेल यांच्या एकलपीठाने तीन खासगी व्यक्तींनी त्यांच्या चॅनेलवर अपलोड केलेले तीन व्हिडीओ काढण्यास सांगितले. कारण या व्हीडिओमधील बाबी आणि वास्तविकता यांचा ताळमेळ नसल्याने न्यायालयाने यूट्युबला वरील आदेश दिले. प्रत्येक व्यक्तीचा गोपनीयतेचा अधिकार आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा अधिकार, यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी अटक केल्यानंतर या तिन्ही व्हीडिओंमध्ये शिल्पा शेट्टीच्या नैतिकतेवर आणि तिच्या पालकत्वाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी व तिच्या कुटुंबियांची मानहानी करणारे अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित मीडिया हाऊसच्याविरोधात तिने मानहानी दावा केला आहे. प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचा बदनामीकारक, अयोग्य वार्तांकन करण्यापासून प्रतिबंध करावा, अशी अंतरिम मागणी शिल्पाने दाव्यात केली आहे.

दावेदाराच्या मागणीमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. चांगले किंवा वाईट वार्तांकनाबाबत न्यायालयीन मर्यादा आहेत. कारण त्याचा परिणाम माध्यमांच्या स्वातंत्र्यावर येईल, असे न्या. पटेल यांनी म्हटले.शिल्पा शेट्टी यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. आमच्याबाबत चांगले बोलणार नसाल तर काहीच बोलू नका, असे माध्यमांना सांगण्यासारखे आहे.असे कसे सांगता येईल? असे न्यायालयाने म्हटले.दरम्यान, न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना शिल्पा शेट्टी हिच्या दाव्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत यावरील पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी ठेवली. 

टॅग्स :Shilpa Shettyशिल्पा शेट्टीRaj Kundraराज कुंद्राHigh Courtउच्च न्यायालयMediaमाध्यमे