शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

Sheena Bora Murder Case : मारियांचे पुस्तकी दावे 'त्या' पोलीस अधिकाऱ्याने फेटाळले; पुस्तक खपासाठी मार्केटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 20:35 IST

Sheena Bora Murder Case : तथ्य ठेवण्याऐवजी अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमी अद्याप पुस्तक वाचलेले नसल्याचे देवेन भारती यांनी सांगितले.मारिया यांनी पुस्तकात त्यांनी अचानक केलेल्या बदली नाराजी व्यक्त आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव गृह केपी बक्षी यांनी सांगितले की, 'मी अद्याप पुस्तक वाचलेले नाही. मी आता प्रतिसाद देऊ शकत नाही.

मुंबई - 'लेट मी से इट नाऊ' ('Let Me Say It Now') या पुस्तकातील वाद आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अवघ्या २ तासानंतर मारिया यांनी केलेले दावे फेटाळत  'मिस्टर मारिया बॉलीवूडच्या कुटुंबात जन्मले आहेत. असे वाटतं की स्क्रिप्ट लेखकांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला असावा. याशिवाय हे  पुस्तक खपासाठी आणि वेब मालिकेसाठी मार्केटिंग केले असल्याचे दिसते, त्यात तथ्य ठेवण्याऐवजी अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी म्हटले आहे. 

मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. मात्र, मी अद्याप पुस्तक वाचलेले नसल्याचे देवेन भारती यांनी सांगितले. शीना बोरा हत्या प्रकरणाच्या चौकशीतून मारिया यांना अचानक बाजूला केल्याने वर्षानुवर्षे एक गूढ होते. त्यांची अचानक बदली का झाली? मारिया खरोखरच पीटर आणि शीनाला मदत करत होते का? देवन भारती देखील पीटरला मदत करत होते का? असे बरेच प्रश्न आहेत जे अद्याप न सुटलेले कोड्यासमान होते.  याबद्दल बरेच निष्कर्ष आणि चर्चा पसरल्या. पण राकेश मारिया यांनी मौन पाळले.पण आता बरीच वर्षे शांत राहिल्यानंतर मुंबईतील माजी पोलिसांनी आयुक्तांनी आपल्या पुस्तकात शीना बोरा हत्याकांडातील चौकशीतून अचानक ट्रान्सफर केल्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. मारिया यांनी पीटर मुखर्जीच्या संरक्षणासाठी वा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या आपल्यावर केलेल्या आरोपाची पोल खोल केली आहे. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेसाठी जबाबदार असलेले आयपीएस अधिकारी देवन भारती (तत्कालीन सहआयुक्त) याचा हवाला देताना मारिया म्हणाले की, शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यामुळे मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अंधारात ठेवले होते.पुस्तकानुसार चौकशीदरम्यान पीटरने मारिया यांना सांगितले की, शीनाच्या गायब होण्याच्या तक्रारीबाबत २०१२ मध्ये देवेन भारती यांच्याशी संपर्क साधला होता. नेहमी भेटत असून देखील भारती यांनी मारिया यांना याबद्दल काहीही सांगितले नाही. याबाबत पलटवार करत देवन भारती यांनी  सांगितले की,शीना बोरा हत्येप्रकरणी पोलिसांना मी सल्ला देतो की त्यांनी याप्रकरणी आरोपपत्र आणि  केस-डायरी वाचावी आणि ही कथा काल्पनिक नाही, खटला चालू आहे, म्हणून जास्त यावर बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु मला असे म्हणायचे आहे की, संपूर्ण तपास पथकाला सर्व घटना माहित आहेत आणि तपास होईपर्यंत मुंबई पोलीस होते. 

Video : Sheena Bora Murder Case : खळबळजनक! राकेश मारियांनी पुस्तकातून केला गौप्यस्फोट

मारिया यांनी पुस्तकात त्यांनी अचानक केलेल्या बदली नाराजी व्यक्त आहे. मारियाच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका मेसेजवरून याबाबत माहिती देण्यात आली होती. तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव गृह केपी बक्षी यांनी सांगितले की, 'मी अद्याप पुस्तक वाचलेले नाही. मी आता प्रतिसाद देऊ शकत नाही. परंतु मी सांगू शकतो की सरकारी आदेशांची अंमलबजावणी झाली. बदली शासनाच्या आदेशावरून करण्यात आली होती. मारिया यांनी जी भाषा वापरली आहे,  ती स्वतःबद्दल बरेच काही सांगते. मारिया यांच्या आरोपावर के.पी. बक्षी म्हणाले, 'प्रत्येक कारणावर लोकांसमोर चर्चा होऊ शकत नाही. मी एवढेच सांगू शकतो की, हा निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे मजबूत आधार होता आणि त्यामुळेच उत्तराधिकारी म्हणून अहमद जावेद यांना मुंबई आयुक्त करण्यात आले होते.

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणRakesh Mariaराकेश मारियाMumbaiमुंबईPoliceपोलिस