शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांनी गुन्हा केला; न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:49 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा आश्रमातील निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश अवधूत सगणे (११) या मुलाचा ७ ऑगस्ट २०१६ रोजी नरबळीच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला होता.

- गणेश देशमुख

मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वदूर भक्त असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा (ता. धामणगाव) येथील शंकर महाराज आणि त्यांच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच विश्वस्त यांनी जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त करीत    धामणगाव न्यायालयाने फौजदारी खटल्यासाठी समन्स (इश्यू प्रोसेस) जारी केले आहेत. ‘लोकमत’ने शोधपत्रकारितेतून हे प्रकरण उघड केले होते, हे विशेष.शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा आश्रमातील निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश अवधूत सगणे (११) या मुलाचा ७ ऑगस्ट २०१६ रोजी नरबळीच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला होता. जखमी अवस्थेत प्रथमेश कसाबसा खोलीबाहेर निघाला. खेळताना पडल्यामुळे टीन लागून जखम झाल्याचा बनाव आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी केला मात्र, पोलिसांत तक्रार दिली नाही. ‘लोकमत’ने ‘इन्व्हेस्टिगेशन’ करून हा नरबळीचा प्रयत्न असल्याचे उघड केले. प्रथमेशचा मित्र अजय सुनील वणवे (१०) याचाही चेहरा तो झोपेत असताना दगडाने ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही या वृत्तमालिकेतून पुढे आले. या घटनेनंतर प्रथमेशची वाचा गेली. 

‘अनुभव ब्रह्म’ पुस्तक न्यायालयातशंकर महाराज यांनी ‘अनुभव ब्रम्ह’ या स्वानुभावातून लिहिलेल्या पुस्तकात महिमा सिद्धी आणि वाचा सिद्धी सांगितल्या आहेत. परकायेत प्रवेश, मृत व्यक्ती जिवंत करणे, इच्छेनुसार जलवर्षाव, पाण्यावर चालणे आदी अवैज्ञानिक बाबींचा त्यात समावेश आहे. ॲड. संजय वानखडे यांनी ‘लोकमत’च्या बातम्या आणि पुस्तक सादर करून धामणगाव न्यायालयात अर्ज केला. शंकर महाराज, ते अध्यक्ष असलेला ट्रस्ट आणि पुस्तक प्रकाशन समितीविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची विनंती केली. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक श्याम मानव, राष्ट्रीय सरचिटणीस गणेश हलकारे, प्रथमेश आणि अजयच्या पालकांची साक्ष न्यायालयाने नोंदविली. हरीश केदार, शेखर पाटील, राजीव खिराडे, मंगेश खेरडे यांनी अंनिसतर्फे शासनाला सत्यशोधन अहवाल सादर केला.

‘इश्यू प्रोसेस’चा दोनदा आदेशधामणगावचे तत्कालिन न्यायदंडाधिकारी व्ही.डी.देशमुख यांच्या न्यायालयानेही यापूर्वी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष काढून ‘इश्यू प्रोसेस’ आदेशित केले होते. त्याविरुद्ध आरोपींनी अमरावती जिल्हा न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली. जिल्हा न्यायालयाने हा आदेश रद्द करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाला पुनर्निर्णय देण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.डी.गोळे यांनी साक्षीपुराव्यांच्या आधारे २२ डिसेंबर रोजी आरोपींविरुद्ध जादुटोणाविरोधी कायद्याच्या कलम २ (१) (घ) आणि ३ (१) (२) अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे नमूद करून फाैजदारी प्रक्रिया संहितेनुसार ‘इश्यू प्रोसेस’चा आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालय