खामगाव : अकोला येथील ३१ वर्षीय युवतीशी मैत्री केल्यानंतर तीला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावून लाँजवर अत्याचार केल्याप्रकरणी पारस येथील चेतन जामोदकर याच्यावर शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला येथील युवतीसोबत पारस येथील चेतन जामोदकर ( वय- ३०) याने मैत्री केली. तसेच तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी तिला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलाविले. गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेऊन बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवतीने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी चेतन जामोदकर याच्याविरुध्द कलम ३७६,४१७,५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.
पैस उसणे देण्याच्या बहाण्याने तरुणीला लॉजवर नेले अन्.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 19:27 IST
Sexual Exploitation of Young Girl गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेऊन बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
पैस उसणे देण्याच्या बहाण्याने तरुणीला लॉजवर नेले अन्.....
ठळक मुद्देपैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलाविले.तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.