शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर लैंगिक अत्याचार;  तिघांना पाच वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 02:03 IST

Crime News : कळवा, वाघोबानगर येथे राहणाऱ्या पीडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मंगल चौधरी (२१, रा. कळवा, ठाणे), वरुण उपाध्याय (१९, रा. वाघोबानगर, ठाणे) आणि भूपेंद्र विश्वकर्मा (२०, रा. वाघोबानगर) या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कळवा, वाघोबानगर येथे राहणाऱ्या पीडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पळवून नेऊन तिच्यावर भूपेंद्र, तसेच अन्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १४ एप्रिल, २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपी मंगल आणि वरुण यांना १५ एप्रिल, २०१४ रोजी, भूपेंद्र याला १४ जून रोजी, तर अन्य एका अल्पवयीन आरोपीला १९ एप्रिल, २०१४ रोजी अटक केली होती. यामध्ये पाचवा आरोपी मात्र फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहळकर यांनी काम पाहिले. 

सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चौथा आरोपी अल्पवयीन n या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे, तसेचसंरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. n यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार