शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीर संबंधास सरसकट बलात्कार मानू नये

By पूनम अपराज | Updated: December 19, 2020 19:15 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट   

ठळक मुद्दे‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

लग्नाचे वचन देऊन ठेवण्यात आलेले शरीर संबंध सरसकटपणे बलात्कार मानले जाऊ नयेत’, असं दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका सुनावणीत निरीक्षण नोंदवले आहे. ‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

बऱ्याच कालावधीपर्यंत एका व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत असताना हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणी ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘जर दोघांमधील शरीरसंबंध खूप काळ असतील तर केवळ लग्नाचं वचन देऊन ते ठेवण्यात आले म्हणून त्याला बलात्कार म्हणता येणार नाही’.

‘काही प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन हे शरीर संबंधांच्या लालसेपोटी दिलेलं असू शकतं. मात्र, महिलेची इच्छा नसल्याने अशा प्रकरणांमध्ये महिला एखाद वेळेसच पूर्ण संमतीने शरीर संबंधांसाठी होकार देते. पण जेव्हा प्रियकराचा खोटेपणा तिच्या लक्षात येतो तेव्हा ती आपली संमती नसल्याचंही स्पष्ट करते. त्यामुळे महिलेला लग्नाचं अमिष दाखवून शरीरसंबंधासाठी तयार करणं म्हणजे महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग करणं आहे. त्यामुळे केवळ अशा मर्जी विरोधात ठेवण्यात आलेल्या शरीर संबंधांच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधान सेक्शन 375 अंतर्गत बलात्काराची शिक्षा होऊ शकते’, असं न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. खूप काळापर्यंत एकत्र असलेल्या प्रेमीयुगुलात शरीरसंबंध होते. लग्नासाठीचं वचनही तिच्या जोडीदाराकडून महिलेला देण्यात आलं होतं. मात्र नंतर हे नातं संपुष्टात आल्यानंतर त्या महिलेने बलात्काराची तक्रार केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारmarriageलग्नdelhiदिल्ली