शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ओळख झाल्याच्या चौथ्या दिवशी शरीर संबंध, वकिलाने घेतला चारित्र्यावर संशय; हायकोर्टाने झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:52 IST

Crime News Uttar Pradesh: केस दाखल होताच अटक होण्यापासून वाचण्यासाठी आरोपी अभय चोप्रा याने हाय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. यावेळी आरोपीच्या वकिलांनी दोन्ही व्यक्ती चार दिवसांतच शरीरसंबंध ठेवतात, म्हणजे परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार आहे, असा युक्तीवाद केला.

प्रयागराज : अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की एखाद्या व्यक्तीच्या डेटिंग साईटवर अॅक्टिव्ह असण्याच्या आधारे त्याची नैतिकता ठरविता येणार नाही. ही टिप्पणी उच्च न्यायालायने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणीवेळी त्याच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर केली आहे. 

पीडिता आरोपीच्या एका डेटिंग साईटवरून संपर्कात आली आणि चौथ्या दिवशीच त्यांच्यात शरीर संबंध बनले. चौथ्या दिवशी ती त्याला भेटण्यासाठी निघाली हे तिची नैतिकता दर्शविते, असे आरोपीच्या वकिलाने म्हटले. न्यायालयाने हा युक्तीवाद अमान्य करत आरोपीचा जामिन फेटाळला. पी़डितेने आरोपीच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी आणि पीडिता एका डेटिंग साईटमुळे एकत्र आले होते. डेटिंग साईटवर ओळख झाल्यावर दोघांमध्ये चार दिवसांमध्येच जवळीक वाढली. एकमेकांना भेटले, शारीरिक संबंध ठेवले. यासाठी त्या तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. मात्र, नंतर त्याने लग्न करण्याचे टाळले. 

केस दाखल होताच अटक होण्यापासून वाचण्यासाठी आरोपी अभय चोप्रा याने हाय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. यावेळी आरोपीच्या वकिलांनी दोन्ही व्यक्ती चार दिवसांतच शरीरसंबंध ठेवतात, म्हणजे परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार आहे. यामुळे बलात्कार होत नाही, असा युक्तीवाद केला. चोप्रा याने तिला लग्न करण्याचे कोणतेही आमिष दिले नव्हते, असे म्हटले. यावर न्यायालयाने वरील टिप्पणी करत चोप्राचा अटकपूर्व जामिन फेटाळला. आरोपीने पोलिसांकडे समर्पण करावे आणि संबंधित न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा असे कोर्टाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय