शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या आरोपीला सात वर्षाचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 20:32 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : पीडित तरुणीने दिला मुलीला जन्म

ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे.या बळजबरीतून ती तरूणी गर्भवती झाली.

गोंदिया - तालुक्याच्या खातीया येथील १९ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे.

सुनील बोहरे याने गावातीलच १९ वर्षाच्या तरूणीवर सन २०१२ एप्रिल महिन्यात तिनशे रुपये देऊन तिच्यावर बळजबरी केली. या बळजबरीतून ती तरूणी गर्भवती झाली. ती ७ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर त्याला लग्नासंदर्भात विचारणा केली असता त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्या पिडीतेने १३ डिसेंबर २०१२ ला पोलिसात तक्रार केली. रावणवाडी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३७६, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या पिडीतेने १० जानेवारी २०१३ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीचे डीएनए चाचणी झाल्यावर ती सुनीलकुमार याचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पैलकर यांनी केला. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ माधुरी आनंद यांनी सुनावणी करताना आरोपी सुनीलकुमार बोहरे याला कलम ३७६ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड, कलम ५०६ ब अंतर्गत ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अ‍ॅड. कैलाश खंडेलवाल व अ‍ॅड. पुरूषोत्तम आगाशे यांनी काम केले.न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव मेश्राम यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारpregnant womanगर्भवती महिला