शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून सुरक्षारक्षकाची आत्महत्या; आर्थिक चणचणीने होता बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 03:20 IST

लॉकडाऊनमुळे नोकरीही गमावली : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देवेंद्र याची एका चांगल्या कंपनीतील नोकरी अलीकडेच गेली

ठाणे : लॉकडाऊनमुळे एका चांगल्या खासगी कंपनीतील नोकरी गेली. त्यातच मोठ्या आजारपणाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या देवेंद्र दत्ताराम कदम (४०, रा. महात्मा फुलेनगर, ठाणे) या सुरक्षारक्षकाने रविवारी सकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देवेंद्र याची एका चांगल्या कंपनीतील नोकरी अलीकडेच गेली. त्यानंतर त्याने खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी पत्करली होती. परंतु, त्याला मोठ्या आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यातच त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याची माहिती त्याला रुग्णालयातून समजली होती. त्यामुळे तणावग्रस्त झाल्याने त्याने ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजण्याच्या सुमारास घरातच कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पत्नी घरकामासाठी गेली हाेती घराबाहेरआरोनीने आत्महत्या केली त्यावेळी त्याची पत्नी दीक्षा (३८) ही घरकामासाठी तर आठ वर्षीय मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Suicideआत्महत्या