शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

दोन पत्नींकडून पतीची वाटणी; करार मोडताच पोलीस चौकी गाठली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 9:00 PM

विचित्र करार मोडल्यानं दुसरी पत्नी पोलीस ठाण्यात; धरणं आंदोलन सुरू

रांची: दोन बायका आणि फजिती ऐका, असा काहीसा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. पतीवरुन दोन पत्नींची भांडणं होऊ लागल्यानं तिघांनी मिळून यावर तोडगा काढला. वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी त्यांनी एक करार केला. मात्र हा करार मोडला गेल्यानं दुसऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणं सोडणार नाही, असा ठाम पवित्रा पत्नीनं घेतला आहे. झारखंडची राजधानी रांचीत घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राजेश कुमार नावाच्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध होते. तो एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यानं त्याच्या प्रेयसीसोबत विवाह केला. या लग्नाला पहिल्या पत्नीनं विरोध केल्यानं प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. यानंतर तिघांनी एक विचित्र करार केला. पती आठवड्यातले पहिले तीन दिवस पहिल्या पत्नीकडे, तर नंतरचे तीन दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहील आणि एक दिवस पतीला सुट्टी असेल, असा हा करार होता. विशेष म्हणजे हा करार लिखित स्वरुपात होता. त्यामुळे काही दिवस तिघांमधील भांडणं कमी झाली. तिघांनी केलेला विचित्र करार जवळपास महिनाभर चालला. मात्र आता या करारामुळे वेगळाच वाद निर्माण झाला असून त्याविरोधात दुसऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं आहे. पहिल्या पत्नीकडे गेलेला पती राजेश दुसऱ्या पत्नीकडे दुर्लक्ष करत आहे. तो तिच्याकडे जायलादेखील तयार नाही. यामुळे दुसरी पत्नी चिंतेत आहे. पतीनं आपल्यालादेखील वेळ द्यावा या मागणीसाठी तिनं थेट पोलीस ठाण्यात धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या विचित्र प्रकरणावर भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.