शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शूटर्सना शस्त्रे पोहोचवणारा नवी मुंबईतील भंगारवाला अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:32 IST

मुख्य आरोपी मात्र मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटर्सपर्यंत शस्त्रे पोहोचविण्यास मदत करणारा नवी मुंबईतील भंगारवाला भागवतसिंग ओमसिंग (वय ३२) याला गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली असून, मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर यांच्यापर्यंत पोहोचण्यास गुन्हे शाखेला अद्याप यश आलेले नाही. या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके मुंबईबाहेर आहेत. आतापर्यंत गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप, हरिशकुमार निसाद, नितीन सप्रे, संभाजी पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, राम फुलचंद कानोजिया यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १० जिवंत काडतुसे, शिवकुमार यादव आणि सुमित यादव या नावाचे आधार कार्ड, मोबाइल, सीमकार्ड तसेच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

उदयपूरमधून शस्त्रे

पोलिस चौकशीत कनोजियाला मुंबईत शस्त्र पोहोचविण्यासाठी भागवतसिंगने मदत केल्याचे समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली. भागवतसिंग हा बेलापूरचा रहिवासी असून, त्याच भागात त्याचे भंगाराचे दुकान आहे. एका गुन्हेगाराच्या ओळखीतून तो कनोजियाच्या संपर्कात आला. त्यानुसार, मे महिन्यात उदयपूरमधून त्याने हत्येसाठी शस्त्रे आणली होती.

शस्त्र पुरवठ्याची कसून चौकशी

शस्त्रांसाठी त्याला जास्तीच्या पैशांचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याने कनोजियाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठीही मदत केल्याचे समोर येत आहे. त्याला ही शस्त्रे कोणी व कशी पुरवली? तसेच यामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे? आणखी शस्त्र पुरवठा कुठे कुठे केला आहे? याबाबत गुन्हे शाखा त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहे.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीNavi Mumbaiनवी मुंबई