शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकांचा २ मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:57 IST

बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपी शिक्षक फरार

भगवान वानखेडे

बुलढाणा - वासनांध शिक्षकाने आधी अश्लील चाळे केले, नंतर संधी मिळताच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत आलटून-पालटून वारंवार लैंगिक अत्याचार केला. या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी ‘त्या’ वासनांध विज्ञान शिक्षकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा तालुक्यातील एका नामांकित शाळेतील विज्ञान विषय शिकविणारा आरोपी शिक्षक धमेंद्र उत्तमराव हिवाळे याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार वारंवार घडत असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना सांगितला. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पीडित विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षक फरार असून, तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.

प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करण्याची धमकीपीडित असलेले दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून, तर नात्याने सख्खे चुलत भाऊ आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना आरोपी शिक्षक धमेंद्र हिवाळे हा दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करीन अशी धमकी देत वासनेचे शिकार बनवत होता. कधी शाळेच्या लॅबमध्ये, तर कधी अडगळीत ठिकाणी दोन्ही विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावून अश्लील कृत्य करीत असे.

सुटीच्या दिवशीही करीत होता अत्याचारपीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची सुटी होती. वसतीगृहातील मुलांवर लक्ष ठेवण्याची दुसऱ्या शिक्षक असतानासुद्धा आरोपी धर्मेंद्र हिवाळे आला. पीडित विद्यार्थी दुपारी जेवणासाठी मेसकडे जात असताना आरोपी धर्मेंद्र हिवाळे याने मुलाला बोलावले व शाळेतील इमारतीमधीलमधील सायन्स लॅबमध्ये नेले. तिथे मुलाचे कपडे काढून त्याच्याशी अश्लील चाळे केले. २० फेब्रुवारी दुपारीसुद्धा तसाच प्रकार घडल्याचे मुलाने तक्रारीत म्हटले आहे.

मुख्यध्यापकांना सांगितली आपबितीदोन्ही विद्यार्थ्यांसोबत आळीपाळीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी शिक्षक हिवाळे यास धडा शिकविण्यासाठी दोन्ही पीडित विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापकांना व फोनद्वारे घरच्यांना कळवली. अखेर २७ फेब्रुवारीच्या रात्री बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून धर्मेंद्र हिवाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.