शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

मुंबईत शाळकरी मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाला अटक

By गौरी टेंबकर | Updated: November 30, 2023 10:26 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली

मुंबई: एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी २९ वर्षीय ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. जेव्हा तिने घरी जाण्यासाठी ऑटो भाड्याने घेतली त्यावेळी हा प्रकार घडला असून याप्रकरणी संजय कुमार साव नामक रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली. दहिसरला राहणारा आरोपी साव याने दहिसर (पश्चिम) आनंद नगर मेट्रो स्टेशन रोडवरून या मुलीला घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. त्यांनतर तिचे चुंबन घेतले, मिठी मारली आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनतर त्याने तिला तिच्या इच्छितस्थानी सोडले. घडल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने याबद्दल कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र ती सामान्यपणे वागत नाही आणि अस्वस्थ असल्याचे पाहून तिच्या पालकांना काहीतरी चुकल्याचे जाणवले आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारले की काय झाले.  त्यानंतर तिने या घटनेबद्दल तिच्या पालकांना सर्व काही सांगितले ज्यांनी नंतर पोलिसांशी संपर्क साधला. दहिसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि मंगळवारी रात्री सावला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्यावर पोकसो आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई