शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; कर्जबाजारी असल्यानं चोरीचा मार्ग अवलंबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 23:47 IST

दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, घरातून चाकूसह दागिने जप्त, कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने कृत्य 

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून बेपत्ता साक्षीदार  कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी (29 रा.उभाबाजार सावंतवाडी)यानेच हे हत्याकांड केल्याची कबुली दिली असून हत्याकांडासाठी वापरण्यात आलेले सुरा ही पोलीसांनी त्याच्या घरातून जप्त केला आहे.हे हत्याकांड कर्जबाजारी असल्यानेच घडवून आणण्यात आले असून सोन्याची चेन सह अन्य दागिने विकून हे कर्ज फेडण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

सावंतवाडी उभाबाजार परिसरात निलीमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन वृध्द महिलांची निर्घुण हत्या झाली होती या हत्याकांडाने सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेला होता सिंधुदुर्गात प्रथमच  गळा चिरून हत्याकांड घडले असल्याने पोलीसही चक्रावून गेले होते पोलिसांची वेगवेगळी पथके आपल्या परीने तपास करत होते.सुरूवातीला हे हत्याकांड जमिन जागेतून घडविण्यात आले असा संशय होता पण खानविलकर यांच्या भाच्याने जागेची कागदपत्रे पोलीसिकडे सादर करताच हे हत्याकांड चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यातून पोलीस तपास करत होते.

हा तपास करतना  पोलीसांना एक महत्वाचा दुवा सापडला होता यात कुशल याच्या चप्पलाचा ठसा मिळाला होता त्यामुळे पोलीसाचा संशय कुशल वर बळवला त्यानंतर तपासाची एक एक कडी उलगडत गेली पण पोलीस तपासा पासून कुशल हा पळत होता.सुरूवातीला त्याला चौकशीला बोलविण्यात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने विषप्राशन करून घरातून निघून गेला त्यामुळे पोलीसाचा संशय आणखी बळवला पण त्याची प्रकृती साथ देत नसल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेत होता.अशातच पोलीस तपास पुढे पुढे जात होता त्याची दुचाकी ही पोलीसानी ताब्यात घेतली त्यानंतर आपण आता पुरता अडकलो आहे.असे दिसताच त्याने पुन्हा घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला तो मंगळवारी 9 नोव्हेंबर ला घरातून पळून गेला सुरूवातीला पोलीसांना गुगारा देण्यासाठी आंबोली च्या जंगलात मोबाईल फेकला आणि मुंबईला गेला पण तेथून ही पत्नीला फोन केला आणि तो पोलीसाच्या चक्रव्यूह फसला सावंतवाडी पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी त्याला ठाणे येथून ताब्यात घेतले शनिवारी त्याला सावंतवाडीत आणण्यात आले आहे.

शनिवारी सावंतवाडीत आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी त्यांची कसून चौकशी केली या चौकशीत त्याने हत्याकांड आपणच घडवल्याची कबुली देत आपल्यावर पाच लाख रूपयांचे कर्ज होते.या कर्जाच्या लोभातूनच हे हत्याकांड केले आरोपीच्या घरातून सुरा जप्त केला आहे.पोलीसांनी आरोपीने हत्याकांडाची कबुली दिल्यानंतर त्याच्या वर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याची रितसर वैद्यकीय तपासणी केली असून अटक करण्यात आले आहे. मुलाला मिठी मारून ढसा ढसा रडलाआरोपी कुशल टगसाळी याने चोरीची कबुली दिल्यानंतर शनिवारी सायकाळी उशिरा त्याला घरी नेण्यात आले त्यावेळी घराचा पंचनामा केल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस घेऊन जात असतना घराबाहेर पत्नी लहान मुलाला घेऊन होती त्या मुलाला धरून आरोपी टगसाळी ढसाढसा रडला.