शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे आमिष दाखवून सरोगसी, लोकमतने केला रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:44 IST

गोरगरीब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविणाऱ्या आणि नंतर त्यांना रक्कम देण्याऐवजी धमक्या देणा-या रॅकेटचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करताच सर्वत्र खळबळ उडाली.

- नरेश डोंगरेनागपूर : गोरगरीब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविणाऱ्या आणि नंतर त्यांना रक्कम देण्याऐवजी धमक्या देणा-या रॅकेटचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करताच सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी एका सरोगसी मदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार तसेच दलालाची भूमिका वठविणाºया मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा मुंधडा या दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली.आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही, अशा दाम्पत्यसोबत संपर्क करून त्यांना अपत्यसुखाचे आमिष दाखवायचे, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे आणि त्यांच्यासाठी गोरगरीब महिलांना सापळ्यात अडकवायचे, असा या रॅकेटचा गोरखधंदा आहे. या रॅकेटने अनेक गरीब महिलांना सरोगसी मदर होण्यासाठी लाखोंचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आहे. कुण्या महिलेला अडीच कुणाला तीन तर कुणाला चार ते पाच लाखांचे आमिष दाखवून सरोगसी मदर होण्यास तयार केले. मात्र एकदा प्रसुती झाली आणि बाळ हातात आले की नंतर त्या महिलेला वाºयावर सोडण्यात येत होते.‘लोकमत’ने या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरली. सायंकाळी या प्रकरणी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार तसेच मुंधडा दाम्पत्याविरुद्ध नंदनवन ठाण्यात भादंविचे कलम ४२० (फसवणूक), ५०६ (धमकी देणे) आणि ३४ (गुन्ह्यात संगणमत) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना शोधण्यास विविध पोलीस पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली. स्वत: ते आरोपीच्या शोधासाठी प्रयत्नरत होते. या पार्श्वभूमीवर आरोपी मनीष आणि त्याची पत्नी हर्षा मुंधडाला पोलीस पथकाने नाट्यमयरीत्या अटक केली.कसून चौकशी सुरू : भरणेपीडित (सरोगसी मदर) महिलांची संख्या वाढत चालल्याने पोलीसही गंभीरपणे चौकशी करीत आहेत. पीडित महिलांना दिलासा देणे, त्यांना आश्वस्त करणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. सोबतच आरोपींना बचावासाठी कुठलीही कायदेशीर पळवाट मिळू नये, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलू आणि आरोपींची आम्ही कसून चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दिली.१० महिलांच्या तक्रारीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत त्यांच्याकडे एकूण दहा महिलांनी तक्रारी नोंदवल्या. मात्र, या प्रकरणात किती महिलांच्या तक्रारीवर किती गुन्हे दाखल झाले आणि त्यात एकूण किती आरोपी आहेत, ते स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा यांना रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांचा १ आॅगस्टपर्यंत पीसीआर मिळवला.

टॅग्स :Crimeगुन्हा