शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

Salman Khan: सलमानला विमानतळावर रोखणारा जवान अडचणीत; माध्यमांशी संवाद साधल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:04 IST

Somnath Mohanti in Trouble after he stops Salman khan on Airport: अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होत होते. गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सलमान खानलाविमानतळावर रोखणारा जवान अडचणीत सापडला आहे. या प्रकारानंतर माध्यमांशी संवाद साधल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ मोहंती असे या जवानाचे नाव आहे.

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होत होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सलमान मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच चाहत्यांनी त्याला घेरले. या गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले.

सुरक्षा तपासणी पूर्ण केल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही,  असे त्याने सलमानला ठणकावून सांगितले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक् झाले. सलमाननेही आढेवेढे न घेता त्याच्या सूचनांचे पालन केले. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सर्वदूर होताच नेटकऱ्यांनी त्या सीआयएसएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक केले.

नियमांचा भंगया प्रकाराबद्दल माध्यमांमध्ये भाष्य केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशातील वृत्तवाहिनीने त्याच्याशी संपर्क साधला होता.

टॅग्स :Salman Khanसलमान खानAirportविमानतळ