शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 07:08 IST

Sachin Vaze : स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती समाेर आल्यानंतर काझीला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली.

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.वाझेच्या अटकेनंतर काझी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. त्याची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती समाेर आल्यानंतर काझीला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याची कोठडी संपत असल्याने त्याला विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. एनआयएने चौकशी पूर्ण झाल्याचे सांगत त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.काझी हा २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. त्याची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर काझीची गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययू) नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययू पथकाचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करत होता. त्याचा जवळचा साथीदार, अशी त्याची ओळख हाेती.

...त्यानंतर बदलीसीआययूने केलेल्या अनेक महत्त्वाच्या कारवाईत तो वाझेसोबत हाेता. वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात काझीची सशस्त्र पोलीस, नायगाव येथे बदली करण्यात आली होती. मात्र, त्याला अटक झाल्यामुळे अटकेच्या दिवसापासून सेवेतून निलंबित करण्यात आले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझे