शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

Sachin Vaze: हिरेन यांच्या हत्येत वाझेंचाच हात; विनायक शिंदेचा कबुली जबाब, ATSच्या अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:28 IST

sachin vaze was involved in mansukh hiren murder case claims ats official: माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदेंनी कबुली दिल्याचा अधिकाऱ्याचा दावा

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील (ATS) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पदावरून निलंबित करण्यात आलेले वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात वाझेंना एनआयएनं अटक केली आहे. (sachin vaze was involved in mansukh hiren murder case claims ats official)काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडेमनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नरेश गोर असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात तो दोषी आढळून आला होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे वाझेचाच हात असल्याची कबुली विनायक शिंदेने दिल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. टीव्ही९ नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मोठा खुलासा! मनसुख हिरेन प्रकरणात अहमदाबाद कनेक्शन आलं समोर एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी काल (रविवारी) एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला. त्यानंतर एटीएसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं हिरेन हत्या प्रकरणात वाझेचाच हात असल्याची कबुली शिंदेने दिल्याचं सांगितलं. हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. तर एनआयए मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारसोबतच हिरेन यांच्या हत्येचाही तपास करत आहे.

मुंब्रा रेतीबंदर परिसरात घटनेचं नाट्य रुपांतरएटीएसचं एक पथक आज विनायक शिंदेला घेऊन मुंब्रा रेतीबंदर परिसरात पोहोचलं. याच ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. एटीएसच्या पथकानं या परिसरात घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन केलं. त्यासाठी या प्रकरणातील आरोपी विनायक शिंदेला रेतीबंदर परिसरात आणण्यात आलं होतं. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरण