शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 21:39 IST

गुजरात पोलिसांनी राजधानी दिल्लीमधून पाच जणांना 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि इतर वस्तूंसह अटक केली आहे.

Gujarat Crime: काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग इव्हेंट पार पडला. या सोहळ्यात जबरी चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राजकोट शहर गुन्हे शाखेने तामिळनाडूच्या ‘त्रिची गँग’मधील पाच जणांना दिल्लीतून 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि वस्तूंसह अटक केली आहे. ही गँग जामनगरमध्ये चोरीच्या उद्देशाने पोहचली होती, पण कडेकोट सुरक्षा पाहून चोरीची योजना रद्द केली.

राजकोट शहर पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, त्रिची टोळीतील सर्व सदस्य तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. अंबानी कुटुंबीच्या सोहळ्यात जबरी चोरी करण्याचा टोळीचा डाव फसला. त्यानंतर या टोळीने गुजरातमधील विविध शहरांमध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या. आधी जामनगर बसस्थानकावर कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरली, त्यानंतर राजकोट आणि दिल्लीतही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या. 

सीसीटीव्ही फुटेजवरून टोळीचा सुगावा लागला2 मार्च रोजी आरोपींनी राजकोटमध्ये मर्सिडीज कारची काच फोडून 10 लाखांची रोकड, लॅपटॉप आणि कागदपत्रांसह 11 लाख 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या घटनेबाबत स्थानिक पोलिस आणि राजकोट गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. याअंतर्गत काही संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळाली. यानंतर गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर चोऱ्यांबद्दल माहिती दिली.

या प्रकरणी राजकोट गुन्हे शाखेच्या पथकाने 43 वर्षीय आरोपी जगन अगामुडियार, 36 वर्षीय दीपक अगामुडियार, 27 वर्षीय गुंशेकर, 62 वर्षीय मुरली मोडलियार आणि 55 वर्षीय आगमराम कातन मुत्रयार यांना दिल्लीतून अटक केली आहे. टोळीचा मास्टर माईंड मधुसूदन उर्फ ​​व्हीजी याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पकडलेल्या टोळीवर यापूर्वी मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि केरळमध्ये चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :GujaratगुजरातMukesh Ambaniमुकेश अंबानीanant ambaniअनंत अंबानीRobberyचोरी