शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

खंडणी मागितल्याप्रकरणी संजय बर्वे यांच्यावर गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 06:56 IST

अंधेरीतील बिल्डरची हायकोर्टात याचिका

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व त्यांची पत्नी आपल्याकडून खंडणी मागून आपला छळ करत आहेत, असा आरोप अंधेरीतील एका बिल्डरने केला आहे. संजय बर्वे यांच्यावर खंडणी मागणे, लाच मागणे इत्यादीबाबत गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्याची चौकशी सीबीआय किंवा त्यासाठी एसआयटी स्थापावी, अशी विनंती करणारी याचिका संबंधित बिल्डरने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.अंधेरीचे मोहम्मद अर्शद मोहम्मद कलीम सिद्दिकी यांनी संजय बर्वे व त्यांच्या पत्नीविरोधात उच्च न्यायालयात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेनुसार, २०१४ मध्ये सिद्दिकी यांची एका मित्रामुळे बर्वे यांच्याशी ओळख झाली. त्या वेळी बर्वे यांनी मजासवाडीत फ्लॅट घेण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. त्यांनी सिद्दिकी यांच्याच मजासवाडी येथील प्रेमनगर येथील इमारतीत दोन फ्लॅट १ कोटी ३४ लाख ८५ हजार ५०० रुपयांना खरेदी केले. १५ एप्रिल २०१५ मध्ये याबाबत अधिकृत नोंदणीही करण्यात आली. मात्र, काही महिन्यांनी बर्वे यांनी आर्थिक गरज असल्याचे सांगत संबंधित फ्लॅट विकायची इच्छा व्यक्त केली. इच्छा नसतानाही सिद्दिकी यांनी ते फ्लॅट परत केले व तीन ते चार हप्त्यांमध्ये १ कोटी २१ लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम परत करण्यासाठी बर्वे व त्यांच्या पत्नीने सिद्दिकी यांच्या पाठी धोशा लावला. इतकी रक्कम परत करूनही बर्वे यांनी सिद्दिकी यांच्या नावावर फ्लॅट केला नाही.

‘बर्वे यांनी अचानकपणे २ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी सिद्दिकी यांच्या कार्यालयात कनिष्ठांना पाठविले व धमकाविले. त्यामुळे सिद्दिकी यांच्या कार्यालयातील महिला सहकारी कामावर गैरहजर राहत आहे. सिद्दिकी यांच्या जीवाला व कुटुंबीयांना धोका असल्याने त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात, लाचलुपचत प्रतिबंधक विभाग, मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार केली. मात्र, कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सिद्दिकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली,’ असे सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत सूचना घेण्याचे निर्देश दिले.बर्वे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आणि त्याची चौकशी सीबीआयने करावी किंवा एसआयटीची स्थापना करावी. कारण बर्वे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने राज्यातील पोलीस त्यांची चौकशी करणार नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस