शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

पैसे खाल्ल्याने पदावरून हटवले; भाजपा आमदाराने पुन्हा केली नियुक्ती, अखेर कोर्टाकडून स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:15 IST

मोहन निंबाळकर यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटविण्यात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पैशांची अफरातफर केल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटविण्यात आलेल्या मोहन निंबाळकर यांची भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी  यांच्या शिफारशीवरून पुन्हा एकदा प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) सारख्या वैधानिक संस्थेचा प्रशासकावर जनतेचा विश्वास असतो. त्यामुळे ते पद कलंक, संशय आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावे, असे न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने म्हटले.

मोहन निंबाळकर यांच्यावर सुरक्षा रक्षक नेमताना २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा तसेच अधिकार नसताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी राज्याच्या विपणन संचालकांना १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाठविला. या अहवालानंतर निंबाळकर यांची एपीएमसी प्रशासक पदावरून गच्छंती केली आणि त्यांच्या जागी प्रगती बगळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. मात्र, कल्याणशेट्टी यांनी शिफारस केली म्हणून विपणन विभागाच्या प्रधान सचिवांनी निंबाळकर यांची प्रशासकपदी पुन्हा नियुक्ती केली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. प्रथमदर्शनी, सरकारचे  हे कृत्य संस्थेच्या अखंडतेशी तडजोड करणारे आहे. पारदर्शकता, जबाबदारी आणि आर्थिक सावधगिरी या वैधानिक उद्दिष्टांशी विसंगत असल्याचे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

या प्रकरणात, प्रथमदर्शनी  निंबाळकर यांची पुनर्नियुक्ती, पूर्वीच्या गंभीर आरोपांना संबोधित न करता किंवा त्यांना त्या आरोपांतून मुक्त न करता कायद्याने योग्य ठरू शकत नाही,  असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने सुनावले...

  • नाईलाजाने या न्यायालयाला निरीक्षण नोंदवावे लागत आहे की, वैधानिक विवेकाधिकार ‘यांत्रिक किंवा बाह्य पद्धतीने’ वापरता येत नाही, मग राजकीय शिफारशीच्या आधारावर तर त्याचा वापर करणे दूरच. 
  • एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप असतानाही त्याची राजकीय शिफारशीवरून पुनर्नियुक्ती करणे, हे मनमानी आणि अवास्तव ठरणार नाही तर कायद्याचे राज्य आणि सार्वजनिक हित देखील कमकुवत करेल, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.
  • न्यायालयाने निंबाळकर यांच्या नियुक्तीला स्थगिती देत विपणन खात्याच्या प्रधान सचिवांना निंबाळकर यांच्याविरोधात अहवाल असतानाही त्यांची शिफारस का केली?  याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. यावर  पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी ठेवली आहे.
टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजी