शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकच निघाले काल्पनिक जीन; ७ महिन्यांत ४० लाखांच्या रकमेवर हात साफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 07:28 IST

घोगावाला यांच्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने या त्रिकुटाने या दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुटुंबातील धार्मिक वातावरणाचा फायदा घेत काल्पनिक जीन घरातील दागिने गिळत असल्याचे सांगून नातेवाईकच दागिन्यांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब भायखळा पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली आहे. ७ महिन्यांत या त्रिकुटाने तब्बल ४० लाखांच्या ऐवजावर हात साफ केला. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. 

माझगाव परिसरात राहणारे अब्दुलकादर शब्बीर गोघावाला (४०) यांच्या घरातून २३ ते २४ सप्टेंबर दरम्यान ४ लाखांच्या दागिन्यांसह १० लाखांची रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. तपासा दरम्यान गोघावाला यांच्या घरातून फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्येही दागिने गायब झाल्याचे समजले. मात्र, घरातील वातावरण धार्मिक असल्याने दागिने काल्पनिक जीन घरातून गायब करत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. यावर विश्वास ठेवून त्यांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांना समजताच, हाच धागा पकडून तपास सुरू केला.

 या काळात त्यांच्या घरातून एकूण ४० लाख १८ हजार किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुहास माने, सचिन पाटील यांनी  तपास करून, घरातील सर्वांची चौकशी केली.  पोलिसांनी हुसेन जुर्जर पत्रावाला,  हुसेन मुर्तझा बॉम्बेवाला आणि अब्बास आदम अत्तारी यांना बेड्या ठोकल्या.

ऑनलाइन गेमिंगसह सट्टेबाजीत उधारी बहिणीचा चुलत भाऊ असलेल्या सुरतच्या हुसेन पत्रावाला तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांनी ऑनलाइन गेमिंगसह सट्टेबाजीत उधारी केली होती. कर्जाचा डोंगर वाढला. त्यात, अल्पवयीन मुलीकडून घरातील दागिन्यांबाबत सुगावा लागताच त्यांनी चोरीचा कट आखला. काल्पनिक जीन दागिने गिळत असल्याचे सांगून दागिन्यांवर हात साफ केला. मात्र, रक्कम गायब झाल्याने तक्रारदार पोलीस ठाण्यात आले आणि पर्दाफाश झाला. 

अल्पवयीन मुलीच्या मदतीने डल्ला घोगावाला यांच्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने या त्रिकुटाने या दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारला. ती संधी साधून दागिने काढून ठेवायचे आणि आरोपी भेटण्यासाठी येताच त्यांना देत असे. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहे.