शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीनं एकटी असताना प्रियकराला बोलावलं; अचानक घरी आला तिचा काका, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:47 IST

युवकाच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.

पीलीभीत - पूरनपूर इथं प्रेयसी घरात एकटी असताना घरी जाणं बॉयफ्रेंडला चांगलेच महागात पडलं आहे. या घटनेनं गावात खळबळ उडाली. प्रेयसीच्या घरच्यांनी बॉयफ्रेंडला बंद खोलीत बेदम बदडलं. घडलेल्या प्रकारानंतर युवकाच्या घरचेही प्रेयसीच्या घरी पोहचले तिथे दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर प्रियकर-प्रेयसीसह ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच गावात राहणाऱ्या युवती आणि युवकामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. हे दोघंही एकमेकांचे नातेवाईक आहेत. ३ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे. परंतु लग्नासाठी दोन्ही कुटुंबाचा नकार आहे. या दोघांना भेटण्यास घरच्यांनी विरोध केला परंतु संधी मिळताच दोघं एकमेकांना लपून भेटत असतात. बुधवारी प्रेयसीच्या घरी कुणीच नव्हते. घरातील सगळे शेतावर गेले होते. त्यावेळी प्रेयसीनं फोन करून युवकाला घरी बोलावलं. तेव्हा अचानक प्रेयसीचा काका घरी पोहचला आणि त्यानं रंगेहाथ दोघांना एकत्र पकडलं. यावेळी संतापलेल्या काकाने इतरांना बोलावून प्रियकराला बंद खोलीत बेदम मारहाण केली. युवकानेही फोन करून त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. तेव्हा प्रेयसीच्या घरी युवकाचे कुटुंबही जमले तिथे दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. 

युवकाच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. प्रेयसीने युवकासोबतच लग्न करणार असा हट्ट धरला. वादानंतर पोलिसांनी युवक, युवती आणि त्यांच्या कुटुंबाला कोतवालीला नेले. दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरोधात मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. तक्रार मिळाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकारी अशोक पाल यांनी म्हटलं. 

तर दुसऱ्या एका घटनेत भावाच्या मित्राने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचं आमिष दाखवत अश्लिल फोटो काढले. त्यानंतर लग्नास नकार दिला. त्यानंतर अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही मुलगी १२ वीच्या वर्गात शिकते. तिच्या भावाचा मित्र रोज घरी येत जात असे. त्याचवेळी युवतीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात युवकाने तिला अडकवलं.