शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नोकरी लावण्यास दिला नकार ; दोघांकडून मुख्याध्यापकाच्या कार, दुचाकी, खिडक्यांची तोडफोड  

By सागर दुबे | Updated: April 1, 2023 14:01 IST

शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेमध्ये नोकरी लावणे माझ्या हातात नाही असे सांगितल्याचा राग येऊन कल्पेश संभाजी भोइेटे (रा.दादावाडी) याच्यासह एकाने कोल्हे नगरातील मुख्याध्यापक तथा मविप्र संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक असलेले महेंद्र वसंतराव भोइेटे यांच्या घराच्या खिडक्यांसह कार, दुचाकी यांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. एवढेच नव्हे तर दोघांनी भोईटे यांच्या हनुमान नगरातील मित्राच्या घरावर सुध्दा दगडफेक करून शिवीगाळ केली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हे नगर येथे महेंद्र भोईटे हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहेत. ते ऑर्डीनन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीला आहेत. तर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक आहेत. त्यामुळे कल्पेश भोईटे हा त्यांना संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगत होता. मात्र, त्यास त्यांनी संस्थेत नोकरी लावणे माझ्या हातात नाही, असे सांगून नकार दिल्यामुळे त्याचा त्याला राग आला होता.झाडांच्या कुंड्या फोडल्या कारवर...गुरूवार, दि. ३० मार्चच्या मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास कल्पेश व त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्तीने भोईटे यांच्या कपांउंटवरील झाडांच्या कुंड्या उचलून त्या दरवाजा आणि कारच्या काचेवर आणि बोनटवर फोडल्या. बाजूला उभी मोपेड दुचाकीची सुध्दा नुकसान केले. त्यानंतर घराच्या खिड्या, नेमप्लेट, गेट लॅप देखील तोडले. त्यानंतर शिवीगाळ करून भोईटे यांना तुला डंपर खाली चिरडून टाकेल, अशी धमकी दिली. या तोडफोडीत भोईटे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले.रात्री दीड वाजता दगडफेककल्पेश व त्याच्या साथीदाने महेंद्र भोईटे यांच्याकडे तोडफोड केल्यानंतर त्यांची त्यांचा मोर्चा भोईटे यांचे हनुमान नगरातील मित्र प्रमोद जयवंतराव काळे यांच्या घराकडे वळविला. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांचे काच फोडून शिवीगाळ केली. अखेर शुक्रवारी भोईटे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी