शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'तेरे बिना मरजावां...' गाण्यावर बनवली Reel; गर्लफ्रेंडच्या घरासमोरच स्वत:ला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:28 IST

शूभम बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला पोहचला होता. परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले

झांसी - प्रेमात वेडे झालेल्या २० वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या घरासमोरच विष पिऊन आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी शूभमनं इन्स्टाग्रामवर तेरे बिना मरजावां...या गाण्यावर रिल बनवून शेअर केलं होतं. या रिलमध्ये त्यानं त्याचा आणि प्रेयसीचा एकत्र असलेला फोटो लावला होता. शूभमनं घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच त्याचं कुटुंब घटनास्थळी पोहचले. 

शूभम बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला पोहचला होता. परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत शूभमच्या घरच्यांनी आरोप केलाय की, प्रेयसीच्या घरातील शूभमला जीवे मारण्याची धमकी देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शूभम वर्मा उर्फ गोलू झांसी हा बडागावच्या गेटबाहेर मास्टर कॉलनीत राहत होता. तो मेडिकल स्टोरमध्ये काम करायचा. मिशन कपाऊंडमध्ये राहणाऱ्या युवतीसोबत त्याचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. 

बुधवारी दुपारी शूभमने इन्स्टाग्रामवर रिल अपलोड केली. त्यात शूभम आणि त्याच्या प्रेयसीचा फोटो लावला होता. रिलमध्ये तेरे बिना मरजावा..हे गाणं पोस्ट केले होते. त्यानंतर तो बाईकवरून मिशन कपाऊंड येथे गेला. ज्याठिकाणी त्याची प्रेयसी राहत होती. तिथेच प्रेयसीच्या घरासमोर शूभमनं विष पिऊन आत्महत्या केली. शूभमचा भाऊ उमेशनं सांगितले की, प्रेयसीच्या वडिलांनी शूभमच्या मित्राला त्याने विष प्यायल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्याठिकाणी पोहचलो. तेव्हा त्याची बाईक उभी होती. फोनदेखील सापडला. आजूबाजूला पाहिले असता तो मैदानात पडल्याचं आढळलं. 

आम्ही तात्काळ शूभमला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केला. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. शूभमच्या घरच्यांनी त्याच्या मृत्यूसाठी प्रेयसीच्या कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. प्रेयसीच्या घरातील शूभमला नेहमी जीवे मारण्याची धमकी द्यायचे असा आरोप शूभमच्या कुटुंबीयांनी केला. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी शूभमने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं खरे कारण समोर येईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"