शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याचा प्रयत्न

By पंकज पाटील | Updated: August 24, 2022 18:04 IST

आरोपी शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे दोघे रहातोली इथल्या जीन्स वॉश कारखान्यात एकाच ठिकाणी कारखान्यात काम करीत होते.

पंकज पाटील

बदलापूर: बदलापूर ग्रामीण भागामध्ये एका आदिवासी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर सतत बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती झाली होती. तिचा गर्भपात करण्यासाठी आरोपीने रुग्णालयात नेले असता त्यावेळेस हा प्रकार उघड झाला. अखेर त्या तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे दोघे रहातोली इथल्या जीन्स वॉश कारखान्यात एकाच ठिकाणी कारखान्यात काम करीत होते. अन्सारी याने या तरुणीच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर बलात्कार केला आणि त्यांच्या शरीरसंबंधाची व्हिडिओ काढून ती व्हिडिओ त्या तरुणीला दाखवून सतत तिच्यावर बलात्कार करीत राहिला. शरीर संबंधाचे व्हिडीओ त्याच्याकडे असल्याने त्या तरुणीने देखील भीतीपोटी तक्रार करण्यास टाळले. या तरुणीवर सतत बलात्कार झाल्याने ती गर्भवती राहिली होती. याची माहिती आरोपी अन्सारी यांना मिळताच त्याने आपले दोन सहकारी मित्र सागर कदम आणि मुकेश दिनगर यांच्या मदतीने तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडित तरुणीला गर्भपातासाठी रुग्णालयात नेले असता त्या तरुणीकडे चौकशी केली असता घडल्या प्रकाराची माहिती समोर आली. त्यानंतर संबंधित पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी शमशाद अन्सारी आणि त्याचे दोन सहकारी सागर कदम आणि मुकेश दिनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कदम आणि मुकेश यांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी अन्सारी हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.