मुंबई : लग्नाचे वचन देत जीएसटी उपायुक्त अरुण चौधरी यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला. तिने मुख्यमंत्री कार्यालय, वरिष्ठ अधिकारी, ओशिवरा पोलिसांना दिलेल्या आॅनलाइन तक्रारीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.पीडित तरुणी ही अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात राहत असून, काही मालिकांमध्ये तिने काम केले आहे. चौधरी यांनी आपण घटस्फोटित असल्याचे सांगून तिला लग्न करण्याचे वचन दिले. शारीरिक संबंध ठेवले. मात्र, ते घटस्फोटित नसून पत्नीसोबत राहत असल्याचे पीडितेला समजले. त्यानंतर, लग्न करण्यासही त्यांनी नकार दिल्याचा आरोप करत, तिने ईमेलद्वारे तक्रार केली. त्यानुसार, चौधरी यांच्या विरोधात बलात्कार, तसेच अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
जीएसटी उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा, अभिनेत्रीच्या ऑनलाइन तक्रारीनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:51 IST