शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्पा मॅनेजरकड़ून खंडणी उकळणारा सराईत खंडणीखोर मास्टर जेरबंद

By मनीषा म्हात्रे | Updated: July 13, 2022 21:32 IST

Extortion Case :गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका स्पाचे मॅनेजर तिमीर जितेंद्र मारू यांच्या ट्विटर हँडलवर स्पाबाबत चुकीची पोस्ट करणाऱ्या व्यक्तिसोबत संपर्क साधला.

मुंबई : गावदेवी परिसरातील स्पा मॅनेजरकड़ून खंडणी उकळणाऱ्या सराईत खंडणीखोर सुदई यादव उर्फ सुधीर मास्टर (३५) याला गावदेवी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याला गुह्यांत मदत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका स्पाचे मॅनेजर तिमीर जितेंद्र मारू यांच्या ट्विटर हँडलवर स्पाबाबत चुकीची पोस्ट करणाऱ्या व्यक्तिसोबत संपर्क साधला. तेव्हा कॉल धारकाने ८ जुलै रोजी कुलाबा येथील एका हॉटेल ठिकाणी येण्यास सांगितले. मारू तेथे पोहचले असता त्यांना एका टॅक्सीतून आलेल्या इसमाने त्यांचे स्पा चालू ठेवायचे असेल तर दर महिना २५ हजार रूपये खंडणी म्हणून दयायचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. मारू यांनी घाबरून ५ हजार रुपये दिले. पुढे ११ तारखेला आणखीन ५ हजार रुपये पाठवले. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी १२ जुलै रोजी व्ही. पी. रोड येथील एका हॉटेलला येण्यास सांगितले.    

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून मास्टरला अटक केली.  अटक आरोपी सुदई यादव उर्फ सुधीर मास्टर याचेविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाणेस आतापर्यंत ५ विविध गंभीर गुन्हयांची नोंद असून त्यामध्ये ४ खंडणीचे आणि १ बलात्कार यासारख्या गंभीर गुन्हयांचा समावेश आहे. मास्टरला यापूर्वी सन २०२० मध्ये पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, मुंबई यांनी एक वर्षांकरीता मुंबई शहर आणि उपनगर येथून हद्दपार केले होते.

तुमच्याकड़ूनही खंडणी उकळली आहे का? 

या गुन्हेगारांबाबत आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी तात्काळ गावदेवी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच सर्व आस्थापना धारक यांनी देखील अशाप्रकारच्या खंडणीखोर व्यक्तींच्या धमकीस घाबरून न जाता तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात आले आहे.

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक