शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यावर उभ्या वाहनांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 03:16 IST

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भुरट्या व जबरी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भुरट्या व जबरी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून आतील किमती ऐवज चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रविवारी वाशी पामबीच मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांना या भुरट्या चोरट्यांचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहनधारकांत असुरक्षिततेची भावना बळावली आहे.रविवारी पामबीच मार्गावर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. इनआॅर्बिट मॉलपासून ही मॅरेथॉन सुरू होणार असल्याने स्पर्धकांनी या परिसरातील रस्त्यावर आपली वाहने उभी केली होती. चोरट्यांनी सहा ते सात वाहनांच्या काचा फोडून आतील मोबाइल व इतक किमती साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे शहरात अगोदरच पार्किंगचे नियोजन फसले आहे. त्यामुळे वाहनधारक रस्त्यावर जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. नेमका याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे. वाहनांतील मोबाइल, लॅपटॉप आदी किमती साहित्य लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाली. या घटना दिवसाढवळ्या अगदी बेमालूपपणे होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली जात आहे. काही महिन्यापूर्वी वाशी सेक्टर २९ येथे रात्रीच्या सुमारास दहा-बारा वाहनांच्या काचा फोडून आतील कार टेप चोरून नेल्याची घटना घडली होती. तर कोपरखैरणे परिसरातही रात्रीच्या वेळी वाहनांतील कार टेप व इतर साहित्य चोरणाºया टोळीचा उपद्रव वाढला. काही ठिकाणी तर वाहनांचे टायर चोरीला जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहने पार्क करणाºया वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.पे अ‍ॅण्ड पार्किंगही असुरक्षितमहापालिकेने शहरात ठिकठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्किंग सुरू केले आहेत, परंतु या पार्किंगमध्ये सुध्दा वाहनांच्या सुरक्षिततेची हमी घेतली जात नाही. रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पार्किंगमधून वाहनातील इंधन चोरीला जाण्याच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. वाशी रेल्वे स्थानकाजवळील पे अ‍ॅण्ड पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीमधून पेट्रोल काढण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरातील वाहनधारकांत कमालीची चिंता निर्माण झाली आहे. या प्रकाराबाबत पोलीस यंत्रणा मूग गिळून बसल्याने चोरट्यांचे अधिक फावल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा