शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:28 IST

Raja-Sonam Raghuvanshi Case: या प्रकरणी तपास जसजसा पुढे जात आहे तसे हैराण करणारे खुलासे समोर येत आहेत.

इंदूर - हनीमून कांडमुळे देशभरात सध्या सोनम रघुवंशी हिची चर्चा सुरू आहे. कधीकाळी सोनम MBA चं पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत होती मात्र आता लग्नाच्या काही दिवसांनीच सोनमवर तिचा पती राजाची हत्या करण्याचा आरोप आहे. या षडयंत्रात सोनमला राज कुशवाह नावाच्या तिच्या कथित प्रियकराने मदत केली. राज कुशवाह प्लायवूड व्यवसायात बिलिंग आणि अकाऊंटचे काम पाहत होता. मेघालयला राजासोबत गेलेला त्याचा मोठा भाऊ विपिनला गोंविंद आणि राज यांच्यात सातत्याने होणाऱ्या बोलण्यावर संशय होता. 

राजनं पडद्यामागे राहून संपूर्ण योजना आखली. त्याने त्याच्या ३ मित्रांना राजाची हत्या करण्यासाठी मेघालयला पाठवले. राजने आमचा विश्वासघात केला असं सोनमच्या कुटुंबाचे म्हणणं आहे. सोनम रघुवंशीने तिची पदवी पूर्ण केली होती आणि पुढील शिक्षणाची तयारी करत होती. परंतु कुटुंबाने तिला घराबाहेर जाण्यास मनाई केली. त्यामुळे सोनमने तिचा भाऊ गोविंदसह प्लायवूड व्यवसायत कुटुंबाला मदत करू लागली आणि इथेच तिची ओळख राज कुशवाहसोबत झाली.

सोनमचा पती राजाची हत्या करण्याचा कट राज कुशवाहने रचल्याचा आरोप आहे. राज सोनमच्या कुटुंबाच्या व्यवसायात बिलिंग आणि अकाऊंटचे काम पाहत होता. राज शांत स्वभावाचा दिसत असल्याने त्याच्या चेहऱ्यामागील भयंकर हेतू कुणालाही कळला नाही. राजाचा मोठा भाऊ विपिनही सोनमचा भाऊ गोविंदसोबत मेघालयला गेला होता. विपिनला गोविंद आणि राज यांच्यात सातत्याने होणाऱ्या बोलण्यावरून संशय आला होता. विपिन म्हणाला की, गोविंद सतत मी सगळं तुझ्यावर सोडले आहे असं बोलत होता. मी शिलांगला असेपर्यंत व्यवसाय सांभाळून घे. परंतु राज हत्याकांडात सहभागी आहे असं गोविंदलाही वाटले नाही असं त्याने सांगितले.

२ दिवसापूर्वीच सोनमच्या कुटुंबाला भेटला राज

दरम्यान, हे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा राज कुशवाह सोनमच्या कुटुंबाला भेटायलाही गेला होता हे आता समोर आले. तो सगळ्यांशी असा बोलला जसे काही झालेच नाही. तो आला, सगळ्यांशी बोलला. तो सोनमसोबत यात सहभागी आहे याचा आम्हाला अंदाज आला नाही असं सोनमचे वडील देवी सिंह यांनी म्हटलं. राजने पाठीमागे राहून हा संपूर्ण डाव रचला. त्याने आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी या ३ मित्रांना मेघालयात राजची हत्या करण्यासाठी पाठवले. राज स्वत: इथेच थांबला आणि त्याने सर्व नियंत्रित केले असं तपासात समोर आले आहे.

लग्नासाठी दिला होता होकार

या प्रकरणी तपास जसजसा पुढे जात आहे तसे हैराण करणारे खुलासे समोर येत आहेत. राजा रघुवंशीसोबत लग्न करण्यासाठी सोनमने आनंदाने होकार दिला. जेव्हा आम्ही घरात लग्नाचा विषय काढला तेव्हा मी स्पष्ट तिला विचारले, तू दुसऱ्या कुणाला पसंत करतेय का तर तिने नाही सांगितले आणि तुम्ही ज्याला निवडाल त्याच्याशी लग्न करेन अशी ग्वाही सोनमने वडिलांना दिली होती हे समोर आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं