शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् राज कुंद्राचा 'मिलियन डॉलर' प्लान उधळला; पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 20:01 IST

पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती समोर; राज कुंद्राचा पाय आणखी खोलात

मुंबई: व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty)  पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीत वाढ झाली आहे. अश्लिल चित्रपट प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राचा पाय दिवसागणिक आणखी खोलात जात आहे. या प्रकरणी दररोज नवनवे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासातून काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कुंद्रा एक मोठा आंतरराष्ट्रीय करार करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली आहे. याबद्दलचं वृत्त न्यूज१८ इंडियानं दिलं आहे. 

राज कुंद्रा १२१ पॉर्न व्हिडीओ ८ कोटी ९३ लाख २२ हजार १८० रुपयांना (१.२० मिलियन डॉलर) विकणार होता. मात्र त्याआधीच त्याला अटक झाली. आता पोलीस कुंद्राच्या येस बँक आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यांची आणि त्यामधून करण्यात आलेल्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. राजनं ऑनलाईन बेटिंग केल्याचं त्याच्या बँक खात्यातून समोर आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. राज पॉर्न व्यवसायातून मिळवलेले पैसे बेटिंगसाठी वापरत असावा असा संशय पोलिसांना आहे. या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहेत.

२१ जुलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली. त्यानंतर बराचसा डेटा डिलीट करण्यात आला. पोलीस आता हा संपूर्ण डेटा रिकव्हर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेनं वियान कंपनीच्या आयटी डेव्हलपरचा जबाबदेखील नोंदवला आहे. अश्लिल चित्रपटांची निर्मिती करणं आणि काही ऍपच्या माध्यमातून ते प्रसारित करणं या आरोपांखाली मुंबई पोलिसांनी १२ जुलैच्या रात्री राजला अटक केली. त्यानंतर २३ जुलैपर्यंत तो पोलीस कोठडीत होता. आज मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्या कोठडीत वाढ केली. राजला २७ जुलैपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टी