शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज कुंद्राची साथीदारासह जामिनावर सुटका; पोर्नोग्राफिक फिल्म्स प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 06:54 IST

आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आपल्याला केवळ बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.

मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून त्यांचे अँपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा व त्याचा सहकारी रायन थोर्प यांची ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी जामिनावर सुटका केली. मुंबई पोलिसांनी काहीच दिवसांपूर्वी पोर्नोग्राफीक फिल्म्स प्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर केले. त्या आरोपपत्रात राज कुंद्रा याचे आरोपी म्हणून नाव आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात राज कुंद्रा याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आपल्याला केवळ बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे. तसेच या प्रकरणात  आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आपलीही जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती कुंद्रा याने न्यायालयाला केली.एफआयआरमध्ये नाव नसतानाही आपल्याला या प्रकरणात नाहक खेचण्यात आले आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. कुंद्राची जामिनावर सुटका केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करेल आणि साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने कुंद्रा व त्याचा आयटी सहकारी रायन थोर्प यांची जामिनावर सुटका केली.