शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी प्रकरणी जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:04 IST

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर बुलडाणा, नांदुरा आणि मेहकर तालुक्यात सहा ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने १३ जून रोजी अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे.

बुलडाणा - महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर बुलडाणा, नांदुरा आणि मेहकर तालुक्यात सहा ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने १३ जून रोजी अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे.  दीड महिन्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात सहकार विभागाने केलेली ही दुसरी मोठी कारवाई म्हणावी लागले.यामध्ये नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील गणेश श्रीकृष्ण भोपळे व अवधा येथील कैलास किसन ढाले यांनी शंकर नरहरी गोंगे, श्रीकृष्ण नरहरी गोंगे व वसंत नरहरी गोंगे (रा. रामदल चौक, नांदुरा) तसेच निमगाव यांच्या विरोधात अवैध सावकारीची तक्रार केली होती. त्या आधारावर चिखली येथील सहाय्यक निबंधक जी. पी. साबळे, लेखा परीक्षक डी. पी. जाधव, जळगाव जामोद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील डी. आर. ईटे यांनी येथे कारवाई केली. या कारवाईत त्यांनी कोरे मुद्रांक, तसेच खरेदी खत व अवैध सावकारीच्या तक्रारी संबंधाने दस्त झडती करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.दरम्यान बिरसिंग पूर येथील बळीराम नारायण बोराडे यांनी बुलडाणा येथील अतुल प्रभाकर लोखंडे (रा. वावरे ले-आऊट, बुलडाणा) यांच्या विरोधात अवैध सावकारीची तक्रार केली होती. त्या आधारे लोखंडे यांच्या राहते घरी खरेदी खत, करारनामा, कोरे मुद्रांक, कोरे चेक असे दस्तऐवज जप्त केले. ही कारवाई बुलडाणा येथील सहाय्यक निबंधक ए. बी. सांगळे व त्यांच्या सहकाºयांनी केली. तिसºया प्रकरणात मेहकर येथील अजगर खान अमजद खान यांनी मेहकर तालुक्यातील मोळा येथील गजानन माळेकर व जानेफळ येथील अमोल राजपूत यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुषंगाने माळेकर आणि राजपूत यांच्या निवासस्थानी कोरे चेक, मुद्रांक, खरेदी खते असे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत श्रेणी एकचे सहकार अधिकारी जी. आर. फाटे (मेहकर) आणि लोणार येथील आर. आर. सावंत यांनी सहभाग घेतला होता.दरम्यान, छाप्यादरम्यान झडतीमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने सध्या सहकार विभाग चौकशी करत आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्यातील प्रशासन व लेखापरिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने  १३ जून रोजी करण्यात आल्याचे सावकारी विभागाचे जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

२६ एप्रिललाही झाली होती कारवाईयापूर्वी दीड महिन्यापूर्वी सहकार विभागाच्या जवळपास ७० अधिकारी, कर्मचा-यांनी एकाच वेळी जिल्ह्यात दहा ठिकाणी छापे मारून अवैध सावकारी प्रकरणी धडक कारवाई केली होती. त्यानंतरची ही अलिकडील काळातील दुसरी मोठी कारवाई असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी