शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यावर छापा; चौघे अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 06:17 IST

crime news गुन्हे शाखेची कारवाई : मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता; संभाजी पाटील सूत्रधार  

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉटरी सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ऑनलाइन जुगारावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या मुख्य आरोपीमार्फत नवी मुंबईसह पनवेलमध्ये दहाहून अधिक ठिकाणी अड्डे चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, त्याने लॉटरी सेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांची पिळवणूक केल्याचेदेखील समजते.

सीबीडी सेक्टर-६ येथील रईस ऑनलाइन ऑक्शन सेंटरमध्ये ऑनलाइन जुगार चालत होता. त्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरला दुपारी कोल्हटकर यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे संगणकाद्वारे एक व दोन आकड्यांचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. एसडीएस ब्रोकिंग व ट्रेडिंग आणि आविष्कार ब्रोकिंग व ट्रेडिंग या दोन कंपन्यांमार्फत हा जुगार चालवला जात होता. 

याप्रकरणी तिथल्या काही व्यक्तींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. संभाजी पाटील याच्याकडून हा ऑनलाइन जुगार चालवला जात होता. यामध्ये राजेंद्र पाटील, योगेश काळोखे व प्रमोद खोत हे त्याचे तीन भागीदार आहेत. त्यापैकी खोत हा दहिसर मोरीचा राहणारा असून उर्वरित तिघे कोपरखैरणेत राहणारे आहेत. या चौघांवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काम करणारी मुले सांगली, कोल्हापूरचीनवी मुंबईसह पनवेल मध्ये  ऑनलाइन जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत. जुगाराच्या अड्ड्यांवर काम करण्यासाठी संभाजी याने काही मुलांना कामावर ठेवले होते. त्यापैकी काही मुले सांगली व कोल्हापूर येथून आणली होती. 

टॅग्स :Policeपोलिस