शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:41 IST

पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे.

मनीषा म्हात्रे मुंबई : पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये यूपीआय हेड, पेटीएम सायबर सेल, मुंबईसह राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे. ठगाच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने तासाभरात पोलिसांशी संपर्क साधताच या ‘अ‍ॅप’द्वारे त्यांचे पैसे वाचविण्यास मदत होत आहे.‘‘साहेब, मदत करा!’’ म्हणत धापा टाकतच अंधेरीच्या प्रियांशू इंजिनीअर या व्यावसायिक तरुणाने गुरुवारी वृद्ध वडिलांसोबत घाटकोपर पोलीस ठाण्यातील सायबर सेल गाठले. ‘केवायसी न केल्याने पेटीएम पुढल्या २४ तासांत बंद होईल. केवायसीसाठी खाली नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.’ असा लघुसंदेश प्राप्त झाला. तो पाहताच कोणतीही खातरजमा न करता प्रियांशूने लघुसंदेशातील नमूद क्रमांकावर संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली होती. सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार संतोष गीध यांनी तरुणाकडे चौकशी करीत बसण्यापेक्षा तत्काळ त्याचा तपशील ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम)’ या ग्रुपमध्ये टाकला. काही क्षणांतच त्याचे खात्यातील २० हजार रुपये वाचले.सरासरी एका पोलीस ठाण्यात अशा स्वरूपात ६ ते ७ तक्रारी येत आहेत. गीध यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठग मंडळी केवायसीच्या नावाखाली ‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप अथवा ‘अ‍ॅमी अ‍ॅडमिन’ नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करताच तुमच्या मोबाइलवर त्यांचा कंट्रोल येतो. त्यानुसार, तुमच्या पेटीएम खात्यातील तपशील चोरून ही मंडळी परस्पर पैसे वळते करतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत अशा टोळ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. आपली कुठलीही गोपनीय माहिती शेअर करू नये. शिवाय quicksuport आणि ammyyadmin  या दोन अ‍ॅपद्वारे फसवणूक होत आहे.>बँकांचा निष्काळजीपणा : अनेक बँकांच्या निष्काळजीपणामुळे हे गुन्हे वाढत असल्याचेही सायबर पोलिसांच्या निरीक्षणातून समोर येत आहे. कुठलीही खातरजमा न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडण्यात येत आहे. केवायसीबाबतही त्यांचा ढिसाळपणा दिसून येत असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.> ‘अर्जंट फ्रॉड’ पेटीएम असे करते काम२० एप्रिल २०१८ रोजी हा ग्रुप तयार करण्यात आला. यात, यूपीआय हेडसह पेटीएम सायबर सेलचे पदाधिकारी आहेत. मुंबईसह राज्यभरातील पोलिसांचा समावेश आहे. यात ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकाचा ट्रान्झेक्शन आयडी आणि डेबिट कार्डचे पहिले ६ आणि शेवटचे ४ अंक टाकण्यात येतात. त्यानुसार ते पैसे कुठून कुठल्या खात्यात गेले याची माहिती मिळते.त्यानंतर पेटीएममध्ये पैसे असल्याचे समजताच ते तत्काळ ब्लॉक करण्यात येतात. जर ते अन्य खात्यात गेल्याचे समजले तर संबंधित बँकेला ‘डेबिट फ्रिज’ करण्याबाबत मेल धाडण्यात येतो. जेणेकरून ती व्यक्ती पैसे काढू शकत नाही.>कॉल नॉयडातून, पैसे पश्चिम बंगालमध्ये... फसवे कॉल हे नॉयडातून येत असल्याचे तर ठगीची रक्कम पश्चिम बंगालच्या खात्यात जात असल्याचे प्रमाण जास्त असल्याची माहितीही पोलीस कारवायांमधून समोर येत आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएम