शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम

By पूनम अपराज | Updated: March 20, 2020 11:56 IST

आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

ठळक मुद्देया दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं.

पूनम अपराज 

मुंबई -  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने  खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. ही शिक्षा फक्त या चार गुन्हेगारांना झालेली नाही तर समाजातील दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं. तसेच चार दोषींनी फाशी लांबविण्यासाठी जो काही कायदेशीर पर्यायांचा फायदा घेतला. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर शंका निर्माण करणारी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. मात्र, अखेर न्याय मिळाला. या दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे. पुनर्विचार याचिकेसाठीही मर्यादा असायला हवी असे देखील निकम पुढे म्हणाले. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपUjjwal Nikamउज्ज्वल निकमMumbaiमुंबई