शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीच्या धाकाने लुटणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:07 IST

इंदापूर-अकलूज राज्यमार्गावर पहाटे टेम्पोचालकाला अडवत तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून ५२ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बारामतीच्या विशेष गुन्हे शोध पथकास यश आले आहे.

बारामती - इंदापूर-अकलूज राज्यमार्गावर पहाटे टेम्पोचालकाला अडवत तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून ५२ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बारामतीच्या विशेष गुन्हे शोध पथकास यश आले आहे. पाच जणांच्या या टोळीतील तिघे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : नितीन ऊर्फ काळ्या बाळू ऊर्फ भारत चव्हाण (रा. शेटफळ, हवेली, ता. इंदापूर), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), दिनेश क्षीरसागर ऊर्फ डी. के. (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमनाथ ऊर्फ लाला राऊत, धनाजी ऊर्फ एमड्या मोरे (रा. शेटफळ हवेली) दोघे फरार आहेत. या पाच जणांवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.दि. १८ जून रोजी फिर्यादी अबुबकर उमर शेख (रा. नाना पेठ, पुणे) इंदापूर-अकलूज मार्गाने टेम्पो घेऊन जात होते. यावेळी अज्ञात पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवर येऊन टेंपोला दुचाकी आडवी लावून टेंपोचालक शेख यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या खिशातील ५२ हजारांची रोकड व टेंपोची चावी हिसकावली होती. याबाबत शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार : काळ्या चव्हाण याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. तो उसाची गाडी नीरा भीमा कारखान्यावर खाली करण्यासाठी घेऊन येणार असल्याचे समजले.त्यानुसार बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य आरोपींना बेड्या ठोकल्या.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, संजय जगदाळे, संदीप मोकाशी, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, संदीप कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, रॉकी देवकाते, शर्मा पवार, विशाल जावळे, दशरथ कोळेकर, सदाशिव बंडगर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी