शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून गर्भवतीला पेटवले, पतीला अटक; कळवा पोलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:41 IST

कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी अनिल चौरसिया याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पतीने दुसरे लग्न केल्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून गर्भवती पत्नीला पेटवून देणाऱ्या अनिल चौरसिया (३५) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी  अनिल चौरसिया याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे. याच कारणावरून त्याचा पत्नीसोबत वारंवार वाद होत होता. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. 

याच वादातून अनिलने सहा महिन्यांच्या त्याच्या गर्भवती पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात गंभीर भाजल्यामुळे तिला बाळ गमवावे लागले. तिच्यावर मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनिलविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या पथकाने त्याला १ नोव्हेंबर रोजी अटक केली.