शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजापती एनसीसीमधून निलंबित; पण मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तक्रारीस नकार!

By जितेंद्र कालेकर | Updated: August 4, 2023 23:02 IST

वैद्यकीय तपासणीलाही विरोध केला. दरम्यान, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ठाणे : ठाण्यातील जोशी बेडेकर (ठाणा कॉलेज) महाविद्यालयात एनसीसीच्या ज्या दहा विद्यार्थ्यांना एनसीसीचा वरिष्ठ कॅडेट शुभम प्रजापतीकडून मारहाण झाली. त्याच्या विरोधात तक्रार देण्यास नकार दिला. त्याचवेळी वादग्रस्त प्रजापतीला एनसीसीमधून निलंबित करण्यात आले. मारहाणीचा हा प्रकार संपूर्ण राज्यभर गाजत आहे. प्रजापतीविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ठाणेनगर पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. शिवाय, वैद्यकीय तपासणीलाही विरोध केला. दरम्यान, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ठाणा कॉलेजमध्ये २६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास कारगिल दिनानिमित्त एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड सुरू होती. याचदरम्यान यातील दहा विद्यार्थ्यांना प्रजापती मारहाण करत असतानाचा व्हिडीओ ३ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. हा व्हिडीओ एका माजी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या लायब्ररीमधून अभ्यासादरम्यान काढला होता. या दहा विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा प्रजापती हा भांडुपच्या कॉलेजमध्ये शिकायला आहे. तो ठाणा कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येत होता. 

ठाणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देताना, बट सॅल्यूट करताना चूक केल्यामुळे शुभमने जितेंद्र रस्तोगी याच्यासह दहा मुलांना प्लास्टिकच्या पोकळ पाइपने मारले, अशी माहिती या मुलांनी ठाणेनगर पोलिसांना ३ ऑगस्ट रोजी जबाबामध्ये दिली. शुभम याच्याविरुद्ध आपली कोणतीही तक्रार नसून आपल्याला वैद्यकीय तपासणीही करायची नसल्याचे या मुलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे.

मारहाण झालेल्यांची नावे जितेंद्र रस्तोगी, सार्थक चोरमाले, अथर्व पवार, शुभम दाते, सोमराज शिंदे, कुणाल खरात, कुणाल कोळेकर, आकाश चतुर्वेदी आणि हर्ष धिवर अशी मारहाण झालेल्यांची नावे असून, त्यांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

शुभमवर झाली निलंबनाची कारवाई एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापती याला एनसीसीमधून निलंबित केले आहे. ठाणेनगर पोलिस ठाण्यात पोलिसांनीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.- गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे