शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शर्मा, वाझेला तातडीने दिली हाेती ‘क्रीम पोस्टिंग’; परमबीर सिंग यांची मेहेरनजर, कागदपत्रांतून आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 13:30 IST

कागदपत्रांतून आले समोर

- जमीर काझीमुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे आणि  प्रदीप शर्मा यांच्यावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर  सिंग यांची सुरुवातीपासून विशेष मर्जी असल्याचे स्पष्ट झाले  आहे. विशेष म्हणजे दीर्घ निलंबनानंतर दोघे पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर २४ तास उलटण्यापूर्वीच त्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळाली होती. सिंग यांनीच त्याबाबतचे आदेश दिले होते, ही बाब कागदपत्रांतून समोर आली आहे.

एनआयएने वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट शर्माला अटक केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लखन भय्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्माला २००८ मध्ये निलंबित करण्यात आले होते. खालच्या कोर्टाने त्याला दोषमुक्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तत्कालीन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी २३ ऑगस्ट २०१७ रोजी त्याचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेतले, त्याच दिवशी त्याचे ठाणे आयुक्तालयात बदलीचे आदेश काढले. तर तत्कालीन ठाणे आयुक्त परमबीर सिंग यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ ऑगस्टला प्रदीप शर्माची गुन्हे शाखेत खंडणी विरोधी पथकात नियुक्तीचे आदेश काढले.याप्रकरणी आता सर्व कागदपत्रे हाती घेण्यात आली  असून त्याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सचिन वाझेच्या नियुक्तीमध्येही सिंग यांनी अशीच गती दाखवली होती. ख्वाजा युनूस प्रकरणात उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेल्या वाझेला गेल्या वर्षी ५ जूनला त्यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई पोलीस आढावा समितीने सेवेत घेतले. त्यानंतर ८ जूनला सशस्त्र दल विभागात त्याची नियुक्ती केली. तर ९ जूनला सिंग यांनी त्याची गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली हाेती. त्यानंतर तत्कालीन सहआयुक्तांचा विरोध असताना त्यांना गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे प्रभारी करण्याचे तोंडी आदेश दिले होते. दोघांकडे सर्व महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपविण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग