शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 18:58 IST

फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती.

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा स्पष्ट आरोप भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. पाकिस्तानने या प्रकरणात व्हिएन्ना करार पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी अशी मागणी भारतने केली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्ट ह्याच महिन्यात निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलभूषण जाधव प्रकरणी येत्या काही आठवड्यात निकाल येण्याची शक्यता असून याबाबत तोंडी माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टच निकालाची तारीख आणि निकालाची घोषणा करेल असे पुढे रवीश कुमार यांनी सांगितले. 

कसं घेतलं कुलभूषण यांना पाकिस्तानने ताब्यात ?

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून मार्च २०१६ मध्ये भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात येऊन ताबडतोब एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. भारताने प्रचंड दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण यांच्या पत्नी व आईला त्यांना भेटण्याची परवानगी दिली. या भेटीच्या वेळीही दोघींना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानच्या या जुलुमाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन पाकिस्तानचे नाक दाबले. या खटल्यात भारताची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानला बेनकाब केले. व्हिएन्ना करारानुसार एखाद्या परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला उच्चस्तरीय मदत देण्यात यावी, कायदेशीर बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असा जागतिक करार करण्यात आला आहे. पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन करून कुलभूषण यांना कोणत्याही प्रकारे बचावाची संधी दिली नाही. कुलभूषण जाधव हे दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा एकही पुरावा पाकिस्तानला देता आला नाही. कुलभूषण यांचा कबुलीजबाबही दबावाखाली घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली होती. या खटल्याचा निकाल लवकरच ह्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने भारताचे लक्ष आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. 

 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयPakistanपाकिस्तान